पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ लो. टिळकांचे चरित्र भाग ३ ण्यास अर्धा तास लागला. तेथून मोठी मिरवणूक निघून टिळकाना लक्ष्मीनारायण धर्मशाळेत पोचविण्यात आले. सोमवारी ता. २६ रोजी दोनप्रहरी रीतीप्रमाणे शिष्टमंडळांची भेट झाली. त्याच दिवशी कॉंग्रेस मुस्लिम-लींग यांच्या शिष्टमंड- ळांच्याहि भेटी झाल्या. यामुळे कलकत्ता व मद्रास इकडील मंडळीहि आली होती. त्याच दिवशी माँटेग्यू साहेबानी बेझंटवाईची व दुसरे दिवशी टिळकांची व्यक्तिशः भेट घेतली. काँग्रेसतर्फे शिष्टमंडळाचा अर्ज बाबू सुरेंद्रनाथ यानी सादर केला. दिल्लीस हे काम सुमारे दोन आठवडे चालून ता. २९ रोजी माँटेग्यू हे कलकत्त्याकडे रवाना झाले. टिळक परत येताना वाटेत त्यांचा दौरा अनेक ठिकाणी ठरविण्यात आला होता. त्याप्रमाणे तो पार पडला. विलायतेत वॅपटिस्टा हे जे काम करीत होते त्यांच्या व बेझंटवाई यांच्या विलायतेतील मंडळीच्या प्रयत्नाने लॅन्सवरी यानी आश्वासनपर असा संदेश हिंदुस्थानाकडे धाडला. त्यात मजूर- पक्षाची सर्वस्वी मदत हिंदुस्थानाला या प्रसंगी होईल असे कळविले होते. ता. २४ ऑक्टोबरच्या पत्नात बॅपटिस्टा यानी लिहिले की " लॅन्सवरी यांच्यासह मी सहा ठिकाणी जाऊन व्याख्याने दिली व हल येथील मोठ्या मजूर परिषदेपुढे मी लीगचा स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. " ता. २६ डिसेंबर रोजी कलकत्ता येथे ३२ वी राष्ट्रीय सभा भरली. सुमारे पाच हजार प्रतिनिधी जमले होते. बाबु वैकुंठनाथ सेन यानी वर्षातील राज- कीय चळवळीचा आढावा घेतला व त्यानंतर बेझंटवाईनीहि स्वतंत्र समालोचन करून आपला उज्ज्वल संदेश सांगितला. याच वर्षात ब्राह्मणेतर चळवळ विशेष सुरू झाली होती. म्हणून मद्रासच्या ब्राह्मणेतराकडून व पंचम लोकाकडून स्वरा- ज्याच्या मागणीला अनुकूल असा संदेश काँग्रेसकडे आला होता ही गोष्ट मह- त्वाची होय. शिवाय सुमारे बारा लक्ष सह्यांचा अर्ज माँटेग्यू साहेबाकडे परस्पर पाठविण्यात आला होता. सभेत विलायतेस डेप्यूटेशन पाठविण्याचे ठरून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडे सोपविण्यात आले. तसेच मजूर परिपदेला बॅ. बॅपटिस्टा याना हिंदी राष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून व मि. पोलॉक याना दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांचे प्रतिनिधी म्हणून पाठवावे असाहि ठराव मंजूर झाला. ता. २२ रोजी माँटेग्यूसाहेब मुंबईस येऊन दाखल झाले होते. तेथे मुंबई कौन्सि- लाचे सभासद अंजुमान - इ - इस्लाम डेक्कन सभा इनामदार वर्ग हिंदी - खिस्ती- मंडळ रयत असोसिएशन कामगार हितवर्धकसभा लिंगायतसभा सार्वजनिकसभा अस्पृश्य वर्ग व्यापारी संघ प्रेसिडेन्सी असोसिएशन पारशी समाज गुजराथचे सर- दार व जैन समाज इतक्या लोकांची शिष्टमंडळे त्याना भेटली व अनेक खाजगी भेटीहि झाल्या. माँटेग्यू साहेबाकडे अखेरपर्यंत एकंदर ११० शिष्टमंडळे गेली व त्यानी ३३० गृहस्थांच्या भेटी घेतल्या. या ११० अर्जापैकी ३५ काँग्रेसच्या माग- णीला पूर्णपणे पाठिंबा देणारे होते. २७ नी काँग्रेसची मागणी मागून शिवाय