पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ सुटके नंतरची नजर कैद रस्त्यातून जावयाचे म्हणजे आपल्या पंचपात्रीतील पळीभर पाणी पुढे टाकून रस्ता शुद्ध करावा व मग पुढे पाऊल टाकावे. आपल्यालाही कदाचित् तसाच रस्ता शुद्ध करावा लागेल. मार्ग शुद्ध आहे की नाही है आज काही सांगता येत नाही तेव्हा मी जे मौन धरले आहे ते सकारण आहे हे आपल्या लक्षात येईल. माझे आणखी बोलणे ऐकण्याची लोकांची इच्छा असेल. परंतु प्रेमाच्या तीव्रतेच्या आवेशात आज तसे करणे हे इष्ट नाही. प्रेमांध होऊन जाण्याचा हल्लीचा प्रसंग नाही. प्रस्तावने- दाखल मी आज या चार गोष्टी सांगितल्या आहेत याचा ग्रंथ पुढे व्हावयाचा आहे. प्रस्तावनेवरून तो ग्रंथ कसा असेल याची कल्पना होईल. कांही चुकीची कल्पना झाली असल्यास ग्रंथ वाचून ती दुरुस्त होईल. " अखेर लोकांचे आभार मानून टिळकानी आपले भाषण पुरे केले. टिळक सुटून आल्यानंतर सर्व लोकानी आपापल्या रीतीने आनंद प्रदर्शित केलाच. पण केसरीनेही आनंद प्रदर्शित करण्याचे कारण विशेष होते. कारण केळकर यानी केसरी हाती घेतल्यानंतर नऊ महिन्यातच नवीन प्रेसअॅक्टचा पूर्ण अंमल केसरीवर होणारसे दिसून आले आणि इशारतीच्या रूपाने मखमाली पिश- वींत घातलेल्या प्रेस अॅक्टच्या पंजाचा आघात केसरीवर पडला. अर्थात् टिळक तुरुंगांत असता केसरी बंद न पडता त्यानी परत येऊन केसरी जिवंत पहावा अशीच केसरीकारांची व सर्व लोकांची आकांक्षा होती. 'या आकांक्षेस अखेर यश दिल्याबद्दल त्या वरिष्ठ व सर्वकश अशा ईश्वरीशक्तीचे आम्ही ऋणि आहो असे उद्गार 'टिळक सुटले ! ' या आनंदोद्गारवाचक अग्रलेखांत केसरीकारानी काढले. (२) सुटके नंतरची नजर कैद , टिळकांचा पुनः जयजयकार होऊ लागणार ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारने उलट उपाय आधीच योजिला होता. वाड्यातील गर्दी कमी व्हावी हीच सर- कारची इच्छा पण ती टिळकांचा दर्शनदानाचा त्रास कमी व्हावा म्हणून नव्हे तर त्यांच्या दर्शनाने आपले अंकित व ऋणानुबंधी लोक विटाळतील त्याना वाचवावे म्हणून ! ता. २५ जून १९१४ रोजी मुंबई सरकारने टिळकांच्या भेटीच्या बंदीचा एकवटहुकूम काढला. मोर नाचला म्हणजे लांडोरीनेहि नाचलेच पाहिजे. त्या- प्रमाणे कोल्हापूर दरबाराने ता. २२ जुलै रोजी दिवाण सबनीस यांच्या सहीने तसाच जाहीरनामा आपल्या राज्यात काढला तो जसाच्या तसा खाली दिला आहे त्यावरून मूळचा जाहीरनामा काय होता हेहि कळून येईल. "बाळ गंगाधर टिळक बंधमुक्त होऊन पुणे येथे परत आल्यामुळे मुंबई इला- ख्याच्या राजकीय परिस्थितीत बराच फेरफार होण्याचा संभव आहे. म्हणून टिळक याने आपली मते बदलली आहेत व आजपर्यंत चळवळ करण्याच्या त्याने स्वीकार- लेल्या मार्गात फेरबदल करण्याचा त्याचा विचार आहे असे त्याच्या प्रत्यक्ष कृतीवरून