पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ इतस्ततः २७ आपले ज्योतिर्गणित स्वतंत्र राहते. या सभेचे अध्यक्षस्थान टिळकांना देण्यात आले होते. त्यानी आपल्या भाषणात या शास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास थोडक्यात सांगून " जुन्या ज्योतिषाना नवी दृष्टि लाभल्यामुळे पंचागसंशोधन आता अवश्य वाटू लागले आहे, दृक्प्रत्ययाची अपेक्षा सर्वानाच पटू लागली आहे, आपले ज्योतिषी लोकहि दुर्बिणी व वेधशाळा यांचे महत्त्व ओळखू लागले आहेत, तरी मुंबईच्या सभेपुढे आणखी एक पाऊल आपण टाकावे" अशी त्यानी विनंती केली. पुढे दोन दिवस खाजगी सभा भरून मोठ्या बहुमताने निर्णय करण्यात आला तो असा की शक १८४० च्या आरंभी अयनांश २३ घ्यावे व वेधशाळा निघाल्यावर प्रत्यक्ष वेधानुरूप घ्यावे. सौर वर्षमान सूर्यसिद्धांता- प्रमाणे पण वेधाप्रमाणे बीजसंस्कार दिलेले, आणि आरंभस्थान निरयण राशी चक्राच्या आरंभी निःशर रेवती भोगतारा हे घ्यावे. या ठरावाला सायनवादी व केवळ ग्रहलाघववादी विरुद्ध होते, परंतु वरील निकाल मोठ्या बहुमताला मान्य होऊन तो ता. २९ रोजी सर्व सभेला जाहीर करण्यात आला. आणि पुढील काम करण्याकरिता एक पंचागमंडळ नेमण्यात आले. ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे यानी उज्जयिनी येथे वेधशाळा स्थापन करण्याचे मान्य करून पंचागशोधनसभेला आश्रय दिला ही आनंददायक गोष्टहि लोकाना या सभेतच कळविण्यात आली. पुढील आठवड्यात टिळक गुजराथेत गोध्रा येथील प्रांतिक परिषदेला पाहुणे म्हणून गेले. परिषदेला सुमारे पंधराशे प्रतिनिधी व दहा हजारावर प्रेक्षक होते. परिषदेचे अध्यक्षस्थान गांधी याना देण्यात आले होते. त्यांच्या भाषणात मुख्य रोख देशाने स्वतः स्वराज्य मिळविण्याकरिता काय केले पाहिजे यावर होता. म्हणून आरोग्यरक्षण गोरक्षण अस्पृश्यतानिवारण स्वदेशी चळवळ स्त्रीशिक्षण व मातृभाषेची अभिवृद्धि इतक्या गोष्टींची त्यानी शिफारस केली. परिषदेनंतर गांधी यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्यसंघाची सभा झाली. गोत्रा परिषदेला दादासाहेब खापर्डे यानाहि मुद्दाम निमंत्रण करण्यात आले होते व त्यानी गुजराथी भाषेत भाषण करून दहा वर्षापूर्वीची सुरत येथील कामगिरी - म्हणजे मराठा गृहस्थाने गुज- राथी लोकाना त्यांच्या मातृभाषेतून आपले मनोगत समजून सांगण्याची कामगिरी- पुनः एकवार केली. ता. १७ नोव्हेंबर रोजी माँटेग्यूसाहेबानी शिष्टमंडळांच्या भेटी घेण्याचे काम सुरू केले. तेव्हा त्याप्रमाणे होमरूल लीगनेहि आपले शिष्टमंडळ पाठ- विण्याचे ठरविले. पुणे व मद्रास दोन्ही लीगनी वेगवेगळी मंडळे बनविली. पुणे संघातर्फे टिळक खापर्डे करंदीकर केळकर बेळवी गंगाधरराव देशपांडे डॉ. मुंजे निळकंठराव उधोजी साठे वेलकर व बेदरकर इतक्या लोकांची योजना झाली. ता. २३ रोजी ही मंडळी मुंबईहून निघाली ती शनिवारी ता. २४ रोजी रात्री दिल्लीस पोचली. गर्दी इतकी झाली होती की डब्यातून सामानासह बाहेर पड-