पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ बंधू यांचीहि सुटका व्हावयास पाहिजे होती. त्याकरिता ता. ३ ऑक्टोबर रोजी मुंबईस मोठी जाहीर सभा भरली. अध्यक्ष भुलाभाई देसाई हे होते. मुख्य ठरा- वावर भाषण करताना टिळक म्हणाले “अल्लीबंधूवर जे आरोप आहेत ते सरकारने शात्रीत केलेले नाहीत किंवा त्यावर त्यांचे म्हणणे ऐकून घेतलेले नाही. आणि इकडे मुसलमान लोकाना राजनिष्ठ म्हणावयाचे पण त्यांच्या पुढाऱ्याना कैदेत ठेवावयाचे यात काय अर्थ ? " मुंबईच्या सभेप्रमाणे दिल्लीपासून मद्रासेपर्यंत याच विषयावर सर्वत्र सभा झाल्या. याच वेळी मुंबईस टिळक असता स्वराज्याच्या मागणीचा म्हणून सर्व लोकाकडून एक रीतसर अर्ज करावा असे ठरले. पुढारी हे कोणी नव्हत तर जनता हीच काय ती मुख्य अशी विलायतेतील काही लोकांची समजूत असते ती दूर करण्याकरिता आणि सह्या घेण्याच्या निमित्ताने होमरूलचे शिक्षण पसरविण्याकरिता ही योजना होती. हा अर्ज तयार होऊन स्वराज्य संघाच्या अनेक शाखाकडे पाठविण्यात आला व त्यांजवर सह्या होऊ लागल्या. कलकत्ता येथील स्वागतमंडळातील भांडणे मिटून बेझंटवाईची अध्यक्ष म्हणून नेमणूक कायम झाली. ऑल इंडिया काँग्रेस कमिटी व मुस्लिमलीग यांच्या सभामध्ये गांधी यानी तयार केलेला अर्जाचा मसुदा मंजूर झाला व त्याहि अर्जावर सर्व देशभर सह्या घेण्याचे कार्य सुरू झाले. ता. ७ ऑक्टोबर रोजी भरलेल्या ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीच्या सभेला टिळक व बेझंटबाई दोघेहि हजर होते. हा अपूर्व योग आल्याने अलाहाबादेस केवढ्या थाटाने मिरवणुकी निघाल्या सभा भरल्या व सत्कारसमारंभ करण्यात आले याची कल्पना कोणा- सहि करता येईल. टिळकांची अलाहाबादेस दोन व्याख्याने झाली तशीच बाई- चीहि झाला. अलाहाबादेहून परत येताच पंढरपूरचे निमंत्रण टिळकांची वाट पहातच होते. ता. २० ऑक्टोबर रोजी पंढरपुरास सोलापूर जिल्ह्याची पहिली जिल्हा सभा भरली. तिचे अध्यक्षस्थान केळकर याना देण्यात आले होते. ही सभा होताच पाठोपाठ टिळक पंढरपुरास आले. जिल्हा सभेला जमलेली सर्व मंडळी त्यांच्याकरिता वाट पहात बसलीच होती. या एका गावात तीनशे कमानी त्यांच्या सत्काराकरिता उभारल्या होत्या. नव्या पेठेत त्यांचे व्याख्यान झाल्यावर दुसऱ्या दिवशी सोलापूर जिल्हा स्वराज्यसंघाने आपलीहि परिषद भरविली. प्रत्येक सभा किंवा परिषद हा टिळकांच्या भाषणाना एक एक नवा प्रसंग सहजच असे. यामुळे स्थानिक लोक मुद्दाम अशा रीतीने वेगवेगळ्या सभा भरवीत . ता. २७ रोजी पुण्यास ज्योतिष संमेलन भरविण्यात आले. बाहेर गावाहून सुमारे पन्नास साठ ज्योतिषी आले होते. स्वागताध्यक्ष प्रो. नाईक यानी १९०४ च्या परिषदेची आठवण करून देऊन त्यात जे उणे राहिले ते येथे पुरे करावे आणि पंचागाची सुधारणा करण्याचे काम शिल्लक ठेवू नये अशी सभेला विनंती केली. त्यांच्या मते हिंदु पंचांगपद्धतीत कालगणना तिथ्यात्मक सौरचांद्र आहे आणि स्थल- मापन नक्षत्राश्रित आहे म्हणून नक्षत्रे आणि तिथिगणना कायम ठेवली म्हणजे