पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ इतस्ततः २५ राहिला तर विपरीत लोकांचे म्हणणे तेवढे त्यांच्या कानी जावयाचे. पण सुदैवाने ही भीति खरी ठरली नाही. ऑगस्ट महिन्यात मद्रास येथे जादा प्रांतिक परिषद भरून वेझंटवाईच्या सुटकेविषयी ठराव झाले आणि हल्लीसारखे जुलूमी हुकूम आणखी यापुढे कोणा- वर निघाले तर ते न जुमानता सत्याग्रह करावा असा ठराव झाला. पण यापुढे तसा प्रसंग फारसा आलाच नाही. नाही होय म्हणता म्हणता बेझंटबाई काँग्रेसच्या अध्यक्ष निवडल्या गेल्या. नऊ प्रांतिक काँग्रेस कमिट्यापैकी त्याना आठानी निवडून दिले. बाईच्या प्रतिपक्षीयानी स्वागतमंडळाच्या सभेत शेवटची लढाई दिली. पण तीत त्यांचा मोड झाला. ज्या व्यक्तीला सरकार छळते त्याला बहुमान देणे हा तरी एक प्रकारचा सत्याग्रहच होय. आता निवडणूक झाल्यावरहि वेळेवर बाईना बंध- मुक्त न केले तर काय करावे हा प्रश्न उरला. पण आयत्या वेळी त्याचे पाहता येईल असे ठरले. ( ९ ) इतस्ततः टिळक स्वराज्यसंघाने बॅपटिस्टा याना विलायतेस पाठविले ते विलायतेस सुख- रूप पोचल्याची तार सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आली. सुखरूप म्हणण्याचे कारण असे की समुद्रावर जहाजाना अजून अपघात होत होते. माँटेग्यूसाहेब इकडे येणार मग चॅपटिस्टा तिकडे जाऊन काय करणार असा प्रश्न कित्येकानी काढला. पण ते निघण्याच्या आधी माँटेग्यू इकडे येण्याची वार्ता नव्हती. आणि कदाचित् असती तरीहि त्याना तिकडे पाठविण्यात आलेच असते. कारण ही चळवळ दुतर्फी चालविणे फायद्याचेच होते. येऊन जाऊन आपले म्हणणेच मांडावयाचे तर स्टेट सेक्रेटरी प्रमाणे विलायतेतील लोकापुढे त्याच वेळी मांडलेले अधिक चांगले व त्याप्रमाणे बॅपटिस्टा विलायतेस गेल्यापासून त्यांचे काम सुरूहि झाले. ता. १७ सप्टेंबर रोजी दादासाहेव करंदीकर याना साठ वर्षे संपून एक- सष्टावे लागले त्या निमित्ताने टिळक व इतर मंडळी साता-यास गेली व त्या रात्री टिळकांचे स्वराज्य या विषयावर व्याख्यान झाले. वाटेत वाई व लिंब या गावाना भेट देऊन परत येताच ते भडोच येथील निमंत्रणावरून तिकडे गेले. भडोच येथे हरिभाई अमीन यानी होमरूल लीगची शाखा काढली होती व त्यानीच हे निमंत्रण दिले होते. दोन प्रहरी मानपत्र समर्पण झाल्यावर संध्याकाळी सभा एवढी मोठी झाली की चारपाच ठिकाणी वेगवेगळे वक्ते उभे करून भाषणे करवावी लागली. ता. १७ सप्टेंबर रोजी मद्रास सरकारने बेझंटबाई यांची मुक्तता केली. त्या परत मद्रासेस येताना वाटभर त्यांचा सत्कार एकसारखा होत होता. सर्व हिंदु- स्थानभर चोहोकडे अभिनंदनाच्या सभा झाल्या व ५ ऑक्टोबर रोजी बाईचा एकाहत्तरावा वाढदिवस मोठ्या थाटाने सर्वत्र पाळण्यात आला. बाईप्रमाणे अल्ली-