पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ असे जाहीर केले होते की 'थिऑसफी व राजकारण मला वेगळी करता येत नाहीत असे विधान बाईनी केले होते ते खोटे होते म्हणून बाईना ते खोडून काढण्याकरिता विलायतेस तार करावयाची होती. याकरिता ती तार व पैसे त्यानी अधिकान्याकडे पाठविले. पण ते त्यानी परत केले व त्यांची तार पाठ- विली नाही. तेव्हा या विषयावरील पत्रव्यवहार प्रसिद्ध करण्याचा बाईनी आग्रह धरिला त्याची मद्राससरकारला चीड आली. याला उत्तर देण्याला लोकाजवळ एक साधन होते ते बाईची निवडणूक पुढील काँग्रेसच्या अध्यक्षाच्या जागी करणे. मुंबई प्रांतिक काँग्रेस कमिटीने बाईचोच निवडणूक केली. इतरहि दोन तीन नावे होती. गांधी जिना महमदाबादचे राजे वगैरे. हा प्रश्न निकालात निघण्याला अजून थोडा अवकाश होता. पण दरम्यान एक महत्वाची गोष्ट घडली तिने लोकांच्या विचाराना एक नवीनच दिशा लावली. (८) भारत मंत्र्यांचा जाहीरनामा ता. २० ऑगष्ट १९१७ रोजी भारतमंत्री मि. माँटेग्यू यानी असा जाहीरनामा प्रसिद्ध केला की "हिंदुस्थानाला जबाबदारीचे स्वराज्य देऊन साम्राज्यातील एक भागीदार करणे हे ब्रिटिश सरकारचे धोरण असून हिंदुस्थान सरकारलाहि ते पूर्णपणे मान्य आहे. या दिशेने महत्वाच्या सुधारणा होतील तितक्या लवकर पण पायरी पायरीने अंमलात कशा आणाव्या याविषयी हिंदुस्थानसरकारशी व लोकाशी वाटाघाट करणे जरूर आहे. म्हणून व्हाईसरॉयसाहेबांच्या निमंत्रणावरून मी सर्वाचे म्हणणे ऐकून घेण्याकरिता हिंदुस्थानास येतो. काही झाले तरी हिंदु- स्थानची अंतिम जबाबदारी सरकारवरच राहील. म्हणून सुधारणांची हप्तेबंदी ही कशी असावी हेहि सरकारच ठरवील. तथापि या सर्व विषयावर सर्वाना आपले म्हणणे पुढे मांडण्याची संधि देण्यात येईल व जो निर्णय ठरेल तो प्रधान- मंडळाच्या परवानगीने पार्लमेंटपुढे मांडण्यात येईल. " काँग्रेसच्या दृष्टीने बोलाव- याचे तर पर्वत उठून महमदाकडे ज ईना म्हणून स्वतः महमदच उठून पर्वताकडे गेला. दुसरे असे की जी गोष्ट तोंडाने उच्चारण्याला हिंदी लोकाना प्रतिबंध होत होता ती राजरोसपणे त्याना भारतमंत्र्यापुढे मांडता येणार. प्रश्न इतकाच उरला की माँटेग्यूसाहेब हिंदुस्थानात आल्यावर ते आपल्या मनाप्रमाणे वागण्याला कितपत मोकळे राहतील? कारण पूर्वी लार्ड हार्डिज यानी एकदा असे उद्गार काढले होते की ' या गुप्त पोलिसांच्या त्रासापासून मला कोणी बाचवील काय ? तसेच स्टेट सेक्रेटरीच्या मागे लचांड लागावयाचे. त्यांचा कार्यक्रम येथील नोकर- शाही ठरविणार. आणि ते स्वतः विचक्षण असल्यामुळे मूर्खधूर्त-न्याय न लागला तरी अस्वल - दरवेशी - न्याय लागू पडावयाचा ! झणजे राजेरजवाडे थोर लोक अशानी त्याना वेढून थाटमाटात व पाहुणचारात किंवा शिकारीत त्यांचा वेळ घेतला म्हणजे त्यांचे मुख्य काम बाजूला राहील. आणि त्यांचा दरबार खुला न