पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ विलायतेतील चळवळीची प्रस्तावना २३ ना असा हुकूम काढण्याचा अधिकार असला तरी १९१५ च्या डिफेन्स ऑफ इंडिया अॅक्टाने तो अधिकार काढून घेतला आहे. सबब विलायतेतील कोर्टाना तो अधिकार राहतो. हिंदुस्थानातील कोर्टाना तो अधिकार उरला असता तर मग विलायती कोर्टाना तो राहिला नसता. १९१५ च्या कायद्याप्रमाणे अटक झाली पण त्या कायद्यातील कलम ३ हे कायद्याच्या मूळ तत्वाला धरून नाही. आणि विलायतच्या कोर्टानी तसे मानल्यास मग कैदेत टाकलेल्या माणसाच्या कृत्यासंबं- धाने विचार करण्याचे कारण रहात नाही. इत्यादि कारणावरून अर्ज चालू शकतो असा कायदेपंडितानी अभिप्राय दिला होता. जुलै महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात ऑल इंडिया काँग्रेस कमिटी व मुस्लिम लीग यांची मिळून सभा मुंबईस झाली. या सभेत मुंबईच्या नेमस्तावर त्यांच्या इतिहासात दुसऱ्यांदा बाजू परतली. कमिटीने मंजूर केलेल्या खलित्यात अटकबंदीचा निषेध केला होता. अलिबंधूना सोडावे असे लिहिले होते. ध्येयाच्या चळवळीकरिता कायद्याने लोकाना द्वार मोकळे ठेवले पाहिजे असे लिहिले होते. आणि विशेष हे की दोन्ही स्वराज्यसंघानी आजवर ज्या चळवळी केल्या त्या काँग्रेसच्या ठरावाला धरूनच आहेत असे स्पष्ट लिहिले. यापूर्वीच माँटेग्यूसाहेबांची नेमणूक स्टेट सेक्रेटरीच्या जागी झाली होती व त्यानी मेसापोटेमियातील कारभारा- वर सडकून टीका केली होती. यामुळे आशा वाटू लागली होती की ते हिंदुस्था- नच्या बाबतीत काही तरी करणार. याचवेळी असा एक प्रश्न निघाला की तुम्ही खलिता हव्या त्या भाषेने लिहा पण तो झिडकारला गेला तर आपला राग व्यक्त करण्याकरिता तुम्ही आम्ही काय करावे ? कित्येक लोकांची सूचना होती की पूर्वी दक्षिण आफ्रिकेत व नुकतेच बिहार प्रांतातील चंपारण्यात मजुरांच्या स्थितीची चौकशी करण्याकरिता गांधी यांनी ज्या सत्याग्रहाचा अवलंब केला त्याचीच शिफारस सर्व हिंदुस्थानला एकदम करावी. पण अखेर ही सूचना प्रत्येक काँग्रेस कमिटीकडे विचाराकरिता पाठविली. अशा रीतीने खलिता रवाना झाला. पण ऑल इंडिया काँग्रेस कमिटीला त्याच्या पाठोपाठ आपले शिष्टमंडळ विलायतेस पाठविण्यासंबंधाने लोकाना काही कळविता आले नाही. इकडे बेझंटबाई अट- केत राहिल्या होत्या त्याना अर्थात् इतर काही उपद्रव नव्हता. पण चळवळ्या मनुष्याला काही न करिता गप्प बैस असे सांगणे व गप्प बसविण्याला लावणे ही शिक्षाच आहे. शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने बाई व त्यांचे सहचारी हे स्वास्थ्यामध्ये होते पण तेथेहि बारीक सारीक गोष्टीत सरकारचा व अधिकाऱ्यांचा थोडा खटका उडेच. वाईनी उटकमंड येथे आपल्या घराजवळ एक स्वराज्याचे म्हणून निशाण उभारले होते. पण ते पाडून टाकावे असा सरकारी हुकूम झाला. दादाभाई बारले तेव्हा त्यांच्या मुलीला बाईनी दुःखप्रदर्शक तार पाठवली. त्यावरहि सर- कारने आक्षेप घेतला की 'तुम्ही आमच्या परवानगीशिवाय तारा किंवा पत्रव्यव- हार करू नये असे असता ही गोष्ट तुम्ही का केली?' विलायतेत प्रधानमंडळाने