पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ त्यांचे पाऊल निघेना. अशी स्थिती झाली. पण या कामातहि होमरूल लीगनेच आघाडी मारली. टिळकांच्या स्वराज्यसंघाने वॅ. बॅपटिस्टा व वेझन्टबाईंच्या संघाने बॅ. अय्यर थाना विलायतेस पाठविण्याचे ठरविले व त्याप्रमाणे ते ता. १४ जुलै रोजी मुंबईहून रवानाहि झाले. यानी विलायतेत कोणती योजना पुढे मांडावी हा प्रश्नच होता. प्रत्येक लीगची वेगळी योजना होतीच. पण काँग्रेसने आपली व मुस्लीम लीगची अशा दोन जमा धरून एक नवी तयार केली होती. आता संघाने स्वतःच्या खर्चाने डेप्युटेशन पाठविल्याने त्याला आपली आवडती योजना पुढे ढकलता आली असती. परंतु यात स्पर्धा कसली ? म्हणून टिळकानी असे ठरविले की पटिस्टा यानी झाले तरी काँग्रेसचीच योजना पुढे मांडून तिचा प्रसार करावा. चालू चळवळीचा किती परिणाम झाला याचे एक गमक असे की सर नारायण चंदावरकर यानीहि टाईम्स ऑफ इंडिया पत्रात बेझन्टबाईना केली अशी अटक करणे बिनसनदशीर आहे असे मत प्रतिपादन केले. ' या अटकबंदीला कायद्याचा आधार असला तरी कायद्याला सनदेचा आधार नाही' हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. त्यांचे असेहि म्हणणे होते 'की सरकार आपल्या म्हणून जर काही योजना मांडीत नाही तर लोकानी आपल्या योजना पुढे मांडल्या तर त्यात काय चूक ? सर- काराला आपली योजना पुढे मांडण्याला अडचण असेल. अवकाश असेल. पण लोकाना जर तशी अडचण नाही व मनाने ते उत्सुक झाले असतील तर त्यानी आपली योजना पुढे का मांडू नये ? निराशा झाली तर त्यांची त्याना' पण ही नुसत्या चंदावरकरांचीच विचारसरणी नसून काही अँग्लो इंडियन पत्रकर्ते देखील तसेच म्हणू लागले होते. त्यांचे म्हणणे तपशीलवार योजना सरकारजवळ नसेल तर नसो. पण सर्वसामान्य आश्वासनपर असा जाहीरनामा काढण्याला त्याना कोणती हरकत ? एवढेच काय पण कोणी असेहि म्हणतात की लॉर्ड विलिंग्डन यानी देखील एखादा बादशाही जाहीरनामा प्रसिद्ध होण्याविषयी आतून विला- यत सरकारकडे टुमणे लाविले होते. बेझंटबाईना अटक झाली त्या प्रसंगी विलायतेहून कायदेपंडितांचे अभि- प्राय बाईनी आणविले होते. व त्यांच्या आधाराने विलायतेतील हायकोर्टाकडे बंधमुक्ततेचा स्पेशल अर्ज करण्याचा बाईंचा विचार होता. परंतु विलायतच्या कोर्टाला यात हात घालण्याचा अधिकार आहे की नाही हा मोठाच प्रश्न होता. एका अर्थी तो होता याचे कारण स्वतः स्टेटसेक्रेटरी विलायतेत राहतो व लोकाना कैदेत ठेवण्याच्या कामी त्याची सहकारिता आहे. बंदीतील लोकाना सोडा असा अर्ज केला असता तो नाही म्हणाला. जॉर्ज बादशहांच्या अंमलातील सर्व मुल- खात हेबियस कॉर्पस कायद्याप्रमाणे बंधमुक्ततेचा हुकूम करण्याचा अधिकार विलायतेतील कोर्टाना मूळ होता. पण १८६१ च्या कायद्याने तो हक्क मर्यादित करण्यात आला. पण तो वसाहती पुरता. पण हिंदुस्थान ही वसाहत नव्हे. या बाबतीत पुराव्याचा बोजा सरकारावर पडण्यासारखा आहे. हिंदुस्थानातील को-