पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ विलायतेतील चळवळीची प्रस्तावना " २१ हा निकालात काढता आला असता. कारण सत्याग्रह करणार तो जो तो आपल्या जवाबदारीवर करणार. पण कित्येक वावदूकानी वेड पांघरून ' सत्याग्रह काय पदार्थ आहे, त्याची व्याख्या काय, त्याची व्याति किती वगैरे बहाणा कर ण्यास सुरवात केली. आणि कित्येक वहादूरानो 'सत्याग्रह ऊर्फ निःशस्त्र प्रतिकार' बेसनदशीर व बेकायदेशीर आहे असा स्पष्ट शब्दानी ठराव मांडला. पण अखेर अप्रिय गोष्ट लांबणीवर टाकण्यास पोटकमिटी नेमावयाची हो ठराविक क्लप्ति अंगि- कारण्यात येऊन प्रश्नाचा निकाल करण्यापेक्षा प्रश्नाच्या निकालाचे काम निकालात काढण्यात आले ! केसरीने लिहिले “सत्याग्रह हा काही अंशी निवळ प्रति- क्रियेच्या स्वरूपाचा असतो व अंगी मार्मिकपणा नसलेल्या लोकाना तो निवळ कर नकन्याचा वसा अरोहि वाटण्याचा संभव आहे. पण अमुक करा किंवा अमुक करू नका असा हुकूम काढण्यात सरकार जेव्हा सत्य व न्याय यांची पायमल्ली करते तेव्हा कर म्हटले ते न करणे व करू नको म्हटले ते करणे यास करनकऱ्याच्या वशाचे स्वरूप सकृद्दर्शनी आले तरी तेच वस्तुतः सत्यप्रियतेचे किंवा न्यायप्रिय- तेच लक्षण मानले पाहिजे. हा प्रश्न काँग्रेस किंवा तिची पोटमंडळे याना कायमचा अंगाबाहेर टाकता येणे शक्य नाही. बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण स्वराज्य वगैरे दिसण्यात जहाल दिसणाऱ्या वादांचा इतिहास अशाच प्रकारचा आहे. व जे ठराव राष्ट्रीय सभेकडून मंजूर करून घेण्यास पूर्वी राष्ट्रीय पक्षास रणे माजवावी लागली तेच आज इतक्या सुलभ रीतीने मंजूर होऊन जात आहेत की त्यांचाच उच्चार आपण करीत आहो की नाही हे उच्चार करणारांच्या व्यानीहि येत नसेल ! ज्या गोष्टींचा उच्चार कित्येकांच्या तोंडातून काढण्याला पूर्वी शेंडी धरून संथा देण्याची जिकीर करावी लागली त्याच गोष्टी आता ते बोलक्या पोपटाप्रमाणे आवडीने बोलू लागले आहेत. यावरून जी गोष्ट पूर्वी राष्ट्रीय सभेच्या ध्येयाची झाली तीच आता राष्ट्रीय सभेच्या कार्यकारी साधनांची होणार आहे हे लक्षात ठेवावे. " तारीख १२ ऑगस्ट रोजी पुन्हा मुंबई प्रांतिक कमिटीची बैठक झाली. माँटेग्यू इकडे येणार म्हणून देशात शांततेचे वातावरण कसेहि करून निर्माण करावे असा नेमस्तांचा तगादा चाललाच होता. यामुळे अखेर तडजोड होऊन म. गांधी टिळक व चंदावरकर या तिघानी मिळून पसंत केलेला ठराव जवळ जवळ तसाच मंजूर करण्यात आला व अशा रीतीने सत्याग्रहास मुंबई प्रां. कमिटीची अखेर मान्यता मिळाली. (७) विलायतेतील चळवळीची प्रस्तावना ऑ. इं. कॉ. कमिटीने काँग्रेसचे डेप्युटेशन विलायतेस पाठविण्याची याजना केली होती तिचा काहीच उपयोग झाला नाही. ज्याना नेमले ते जाईनात. जे जाऊ इच्छित त्याना नेमीनात, ज्याना नेमले व ज्यानी जाण्याचे कबूल केले