पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० लो० टिळकांचे चरित्र भाग ३ वून परत येताना ते मोतीहारीस गेले. दुसऱ्याच दिवशी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने त्यांच्यावर १४४ कलमाखाली नोटीस बजावली आणि सार्वजनिक शांततेचा भंग व धंगाधोपा होण्याचा संभव असल्याने तुम्ही ताबडतोब चंपारण्यातून चालते व्हा म्हणून हुकूम केला. यावर गांधीनी स्पष्ट जवाब दिला की " माझेवरील सार्वजनिक जबाबदारी मी ओळखतो. मला येथून निघून जाता येईलसे वाटत नाही. तुम्हाला काय करावयाचे असेल ते बेलाशक करा. " दुसरे दिवशी मॅजिस्ट्रेटपुढे त्याना उभे करण्यात आले. तेव्हा त्यानी सांगितले की " दंगाधोपा करून चळवळ करावी असा येथे येण्यात माझा बिलकूल उद्देश नाही. राजकीय कामापेक्षाहि हे एक भूतदयेचे व सार्वजनिक काम आहे असे मी मानतो. केवळ परिस्थितीचा अभ्यास करण्याकरिता व शक्य तर मळेवाले व मजूर या दोघानाहि हा प्रश्न सोडव- ण्यास मदत करावी म्हणून मी येथे आलो आहे. व हे जर सरकारला पसंत नसेल तर त्यानी मला वाटल्यास जबरीने उचलून दूर पाठवावे. युक्तायुक्तांच्या शृंगाप- तीत सरकारी हुकूम मानण्यापेक्षा मी आपल्या सद्सद्विवेकबुद्धीलाच अधिक मानतो.' "3 गांधी यांच्या या जत्रात्रामुळे पुढे काय करावे हे मॅजिस्ट्रेटासहि कोडे पडले व गांधींची चौकशी तहकूब करून बहार सरकारचे मत घेण्याचे त्याने ठरवले. धटास घट भेटलेला पहाताच बहार सरकारने ताळ्यावर येऊन नोटीस रद्द करावी असा हुकूम दिला. अर्थात् अँग्लो इंडिअन मळेवाल्यांचे पित्त अगदी खवळून गेले. व चौकशी करणे असेल तर ती सरकारनेच करावी, निदान सरकारी व बिनसरकारी गृहस्थांची कमिटी नेमून तिने ती करावी पण एकट्या गांधीना ती करू देऊ नये म्हणून चळवळ सुरू केली. तसेच गांधीवर नाही नाही ते आरोप करण्यास सुर- वात केली. कित्येकानी तर गांधी याना हद्दपार करावे नाहीतर आम्ही सरकारास न जुमानता पाहिजे ते करू अशा उघड धमक्या पायोनिअर सारख्या पत्रातून देण्यास सुरवात केली. केसरीने यावर म्हटले " यावरून बहार प्रांतात सरकारचे राज्य नसून मळेवाल्यांचे राज्य आहे असे स्पष्ट म्हणावे लागते.” अखेर या नाजुक परिस्थितीतून सुटण्याकरिता कमिशन नेमणे एवढा एकच राजमार्ग आहे असे सरकारास दिसून आले. व त्याप्रमाणे जून महिन्यात कमिशन नेमले जाऊन त्यामध्ये गांधीनाहि घेण्यात आले. विचाऱ्या मजूरांच्यातर्फे गांधी हे एकटेच सभा- सद कमिशनमध्ये होते. तथापि कमिशनच्या चौकशीत हिंदी मजूरांच्या हालअपे- ष्टांचा इतका भरभक्कम साक्षीपुरावा कमिशनपुढे आला की " या बाबतीत चौक- शीच व्हावयास पाहिजे होती " अशी उघड कबुली कमिशनने दिली व अशा रीतीने गांधींच्या सत्याग्रहाचा विजय झाला. इकडे बेझंटबाईनाहि अटक केल्यामुळे स्वराज्यवादी लोक सत्याग्रहाकडे वळले होते. व यामुळे मुंबई काँग्रेस कमिटीने सत्याग्रहाचे तत्त्व मान्य करून मान्य- तेचा शेरा द्यावयाचा की नाही असा एक नाजुक प्रश्न उपस्थित केला होता. वास्तविक सत्याग्रहास नुसती शिफारसवजा मान्यता देऊन हा प्रश्न कमिटीला