पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ सत्याग्रहाच्या चळवळीचा प्रारंभ १९ सह्या होऊ लागल्या. वमनजी शेट यानी एक लाख रुपये चळवळीकरिता देऊ केले. नेमस्तांपैकी सुरेंद्रनाथ जिना भूग्र हे मी स्वराज्यवादी आहे असे म्हणू व लिहून देऊ लागले. आणि महाराष्ट्र स्वराज्यसंघाकडे सर्व जिल्ह्यातून खालील पत्रक सह्या करून दप्तरी दाखल ठेवण्यासाठी येऊ लागले. ते पत्रक असे:- “१९१६ साली लखनौ येथील राष्ट्रीय समेत झालेल्या ठरावान्वये जी स्वराज्य योजनेची मागणी निश्चित झाली व जिला आम्ही होमरूल असे म्हणतो त्या मागणीचा पुरस्कार आम्ही आजवर करीत आलो त्याप्रमाणे पुढेहि करीत राहू. लॉर्ड पैंटलन्ड यांच्या ता. २४ मेच्या भाषणाचा आम्ही निषेध करतो. वर सांगि- तलेल्या प्रकारच्या स्वराज्याची मागणी सरकारने बेकायदेशीर ठरविली तरी आम्ही स्वराज्यवादापासून पराङ्मुख होणार नाही. व या कृत्याचे जे परिणाम होतील ते भोगू असे आपणास कळवितो. " हैं उत्तर रोखठोक होते व मुद्देसूद होते. आणि आम्हाला योग्य दिसतील ते उपाय योजू ही जी धमकी तिला आव्हान होते. अलाहाबादचे चिंतामणी यानी स्वतः स्वराज्यसंघाचे सभासद होऊन सर्व काँग्रेस भक्तानाहि तसे करण्याला विनंति केली. त्यात त्यानी लिहिले की "तुम्ही असा प्रश्न कराल की आम्ही कॉंग्रेसचे अनुयायी आहो. आणि काँग्रेसने स्वराज्याचा प्रश्न हाती घेतलाच आहे मग स्वराज्यसंघाचे सभासद होण्यातच अधिक श्रेय काय आहे ? त्यावर माझे उत्तर असे की होय अधिक श्रेय आहे. वयाचे दात वेगळे व खावयाचे वेगळे आहेत. अगदी खोलात जाऊन पाहिले तर अगदी अल्पसंतुष्ट काँग्रेस भक्त आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी होमरूलर या उभय- तांचाहि सरकाराला मनातून सारखाच तिटकारा आहे. परंतु रणनीतीस अनुसरून सरकार प्रथम एकट्या होमरूल लीगवर घाला घालू पाहत आहे. अशा वेळी स्वराज्यवाद्यानी मी काँग्रेसवाला पण मी होमरूलर नव्हे असा भेद मनात ठेवल्यास इतिहासाची पुनरावृत्ती होईल व १९०६ ते १९०९ पर्यंत जे घडले ते घडेल. प्रथम जात्यातले व नंतर सुपातले भरडले जातील. त्यांचा आमचा भेद असला तरी तो फारच सूक्ष्म आहे. अशा वेळीहि जो मनुष्य होमरूल लीगचा सभासद होणार नाही त्याला दुरून नमस्कार असो ! " (६) सत्याग्रहाच्या चळवळीचा प्रारंभ सरकारचे दाखवा - इकडे स्वराज्याची चळवळ चालू असताच गांधींची सत्याग्रहाची नवीन चळवळ सुरू होती. बहार प्रांतातील चंपारण्य जिल्ह्यात निळीची लागवड कर- णारे गोरे मळेवाले व त्यांचे मजूर यामध्ये बरेच दिवस तंटा होता. सरकारने गुलामगिरी बंद केली खरी. पण दिव्याखाली अंधेर या न्यायाने हिंदुस्थानात व इतरत्र साम्राज्यात मुदतबंदीची मजूर पद्धति चालूच होती. अर्थात् या संबंधाने चौकशी करण्याकरिता बहार प्रांतातील पुढाऱ्यानी तिकडे येण्याविषयी गांधीना विनंति केली. त्याप्रमाणे कलकत्त्याहून ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे काम संप-