पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ लो. टिळकांचे चरित्र भाग ३ करतो की मी होमरूल मागण्याचे समर्थन करणार त्याबद्दल त्यानी काय ती शिक्षा करावी. हे झाल्यावरोवर याच अर्थाची शेकडो पत्रे प्रसिद्ध होऊन "होय आम्हीहि होमरूल मागतो आम्हावर काय खटला करावयाचा तो करा" असे लोक सर- कारला आव्हान देऊ लागले. लवकरच बेझंटवाई अकंडेल व वाडिया यांच्यावर नोटीस बजावण्यात आली की सरकारने सांगितलेल्या ४।५ ठिकाणापैकी एखादे पसंत करून "तेथेच यापुढे तुम्ही राहिले पाहिजे. आणि यापुढे तुम्ही कोणतीहि चळवळ करता कामा नये, म्हणजे सभेला जाऊ नये बोलू नये सभा भरवू नये जुने छापू नये नवे लिहू नये. " ही नोटीस मान्य करण्याचे बाईनी ठरविले. पण मी होमरूलची मागणी सोडणार नाही असेहि त्यानी सांगितले. सर्व लोकाना संदेश म्हणून एक पत्र प्रसिद्ध करून त्या गव्हर्नर साहेबांच्या भेटीला गेल्या आणि नंतर उटकमंड येथे जाऊन राहिल्या. यापूर्वी सरकारने या चळवळीत न पडण्याविषयी विद्यार्थी- वर्गाला रिस्ले सर्क्युलराची आठवण करून ताकीद दिली. वर्तमानपत्रावर प्रेस अॅक्ट चालू केला होता. पोलिस अॅक्टाप्रमाणे व्याख्यानाना बंदी करण्यात येऊ लागली होती. टिळकांवर पिनलकोडप्रमाणे खटला केला तो फुकट गेला पण डिफेन्स ऑफ इंडिया अॅक्टाचा अंमल करणे ही सोयीची गोष्ट होती. म्हणून त्यानी त्या मार्गाने प्रयत्न सुरू केला आणि बेझन्टबाई नाही अशी अटक केली. अर्थात ही वेळ अशी होती की होमरूलवाले तर संकटातच होते पण बाहेरच्या लोकानी त्यांची बाजू उचलून धरून सरकारास दटवावयास पाहिजे होते. म्हणून टिळकानी लोकाना यावेळी अशी प्रार्थना केली की आपसातील इतर सर्व बाद यावेळी विसरून होमरूलचे समर्थन करण्याच्या मार्गाला त्यानी लागावे. बाई ब लॉर्ड पेंटलन्ड याजमध्ये झालेले संभाषण पुढे प्रसिद्धहि झाले. तीत बाई म्हणाल्या की 'माझ्यावर आरोप काय तो तरी सांगा व माझा खुलासा व्या.' त्यावर गव्हर्नरसाहेब म्हणाले 'मी या वादात पडू इच्छित नाही. तुम्हाला युद्ध संपेपर्यंत विलायतेस जाव- याचे असेल तर परवानगी देतो पण येथे तुम्ही चळवळ बंद केली पाहिजे.' बाईनी लखनौचा ठराव काढून त्याना दाखविला. ते म्हणाले 'तो मी यापूर्वी वाचला नव्हता. तरी पण तुमच्या सर्व चळवळी सरकारने बंद करण्याचे ठरविले आहे. तुमचे अमुक कृत्य कायदेशीर व अमुक बेकायदेशीर असे सरकारला पृथ:- करण करता येत नाही.' तेव्हा बाई म्हणाल्या की 'तुम्ही चर्चा करू इच्छित नाही तर मीहि हे संभाषण यापुढे चालवू इच्छित नाही' असे म्हणून त्या निघून गेल्या. या अविचारी कृत्याचा परिणाम सुलट न होता उलटच झाला. कारण स्वराज्यवादाचा सत्याग्रह ही एक नवीनच चलवळ निघाली. मद्रासेकडे त्याच- प्रमाणे हिंदुस्थानातील निरनिराळ्या भागात लोक भराभर पुढे येऊन सभा भर- वून निषेध तर करूच लागले. पण लॉर्ड पेंटलन्ड यानी जे करू नये म्हणून सांगि- तले तेच करण्याला प्रवृत्त झाले, आणि स्वराज्य संघाच्या प्रतिज्ञापत्रकावर भराभर