पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ लो० टिळकांचे चरित्र भाग १ नंतर अण्णासाहेब पटवर्धन यानी अध्यक्षस्थान स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय पक्षाच्या अनेक संस्थाकडून तसेच वन्हाड नागपूर सातारा नगर खानदेश मुंबई येथील पुढाऱ्यानी व प्रतिनिधीनी टिळकांच्या गळ्यांत हार घातले. यानंतर टिळ- कांचे भाषण झाले. सुटकेनंतर टिळकांचे हे पहिलेच जाहीर भाषण होते. टिळक म्हणाले- 66 'सुख व दुःख यांत भेद आहे. दुःखाला भागीदार मिळाले असता ते कमी होते, तसे सुखाचे नाहीं. सुखाला भागीदार मिळाले असता उलट ते वाढतेच. आज येथे जमलेला समाज व आज दोन तीन दिवस माझे भेटीकरिता आलेला जनसमूह पाहून माझ्या सुटकेपासून मला जे सुख झाले असेल त्याची वाढ सहस्रपट नन्हे लक्षपट झाली आहे. माझ्याशी चार शब्द बोलावे अशी पुष्कळांची इच्छा होती व त्या चार शब्दासाठी कित्येकांनी दोन दोन तास खर्चही केले. त्यांचा हा जो काल व्यर्थ गेला त्याबद्दल मला वाईट वाटते. खरोखरी माझा त्याला नाइलाज होता. हल्लीच्या माझ्या प्रकृतीच्या मानाने मला प्रत्येकाशी चार शब्द बोलणे अशक्य आहे. ही सवय म्हणून मी पुढे आणीत नाही तर ही सत्य गोष्ट आहे व आपण सर्वांनी सत्य म्हणूनच तिचा स्वीकार करावा अशी माझी प्रार्थना आहे. " "आज सहा वर्षांनी मी परत आलो व जेव्हा सर्व परिस्थिति पाहू लागलो तेव्हा मला वॉशिंग्टन आयर्व्हिनच्या स्केच बुकामधील रिप व्हॅन विंकलची गोष्ट आठवली. तो कित्येक वर्षे झोपेत होता. तो जेव्हा जागा झाला तेव्हा त्याला सर्व सृष्टि नवी दिसू लागली. तशी माझी अवस्था झाली आहे. आज सहा वर्षात कोणकोणत्या गोष्टी झाल्या, त्या वेळी असलेल्या माणसापैकी हयात किती व गेली किती याची मला वार्ता लागू नये - त्याचे मला स्मरणसुद्धा होऊ नये अशा प्रकारची माझी व्यवस्था ठेवण्यात आली होती. जग आहे की नाही, असल्यास ते कोणत्या स्थितीत आहे हे मी विसरावे असाच मला या रीतीने वागविण्यात हेतु असावा असे मला वाटले. मग प्रत्यक्ष सरकारच्या मनात काय होते ते कोणास ठाऊक १ येथे जमलेल्या समाजाने आज माझे जे स्वागत केले आहे त्यावरून लोक मला विसरले नाहीत असे वाटते. मीहि लोकाना विसरलो नाही. माझ्यावर असलेले प्रेम लोकानी आज येथे जमून जसे व्यक्त केले तशा तऱ्हेने माझे लोकावर असलेले प्रेम व्यक्त होण्यासारखे नाही. तथापि माझे लोकांवर असलेले प्रेम आहे तसेच कायम आहे व त्याची आठवण मला होती हे आपण निःसंशय खरे मानावे. सहा वर्षापूर्वी मी आपल्याशी ज्या तऱ्हेने वागलो त्याच तऱ्हेने त्याच नात्याने व त्याच पेशाने यापुढे मी वागेन आणि आपणही माझा पूर्वीप्रमाणेच स्वीकार करण्यास तयार आहा याचे येथे आज जमलेला समाज हेच एक प्रमाण आहे. " " पुढे तुम्ही काय करणार असा पुष्कळानी मला प्रश्न केला. आता यापुढे पाऊल कसे ठेवावे याचाच विचार करावयाचा आहे. ज्या रस्त्याने आपल्याला जावयाचे तो साफ आहे की नाही हे प्रथम पहावे लागते. वैदिकांचा अशी एक चाल आहे की