पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ बाईंना अटक १७ याच सुमारास उटकमंड येथे मद्रास कौन्सिलची बैठक झाली तीत गव्हर्नर लॉर्ड पेंटलन्ड यानी भाषण केले त्यावरून दडपशाही वाढणार असे दिसून आले. त्यात ते म्हणाले "हिंदी लोकांचे साध्या सुधारणानी समाधान न होता ते जबाबदारीचे स्वराज्य व तेहि ताबडतोबीने मागू लागले आहेत. आणि हे तर देणे शक्य नाही. ज्या सुधारणा युद्धानंतर इंग्लंड देईल त्या होमरूलपेक्षा अर्थातच कमी असतील. हे माहीत असून होमरूल मागण्याची चळवळ लोकानी चालविल्याचा परिणाम असा होईल की सरकार व लोक यामध्ये मतभेद गैरसमज व कदाचित घासाघीस आणि मारामारहि होईल. या सर्वांची जबाबदारी चळवळ करणारावर आहे. सावध- गिरीचा इशारा ते मानीत नाहीत. खोट्या आशा बाळगिल्याने फसवणूक व निराशा होते. चळवळ करणारांची मते प्रामाणिक असतील. पण त्यांच्या व्याख्या- नानी अधिकाऱ्यांची निंदा होते व कायदा मोडण्याची लोकात प्रवृत्ति होते. म्हणून आम्ही योग्य दिसतील ते उपाय योजू, त्यात लोकानी आम्हाला मदत करावी. " १९०८ साली टिळकावर खटला झाला त्यापूर्वी लॉर्ड सिडेनहॅम यानी कौन्सिलात असेच भाषण केले होते व लॉर्ड पेंटलन्ड यांच्या भाषणावरून बेझन्टबाईना अटक होणार असा लोकांचा तर्क झाला. (५) बेझंट बाईना अटक हिंदुस्थानला असे वागवून तिकडे आयरिश होमरूलचा प्रश्न मात्र प्रधान- मंडळाने आपण होऊन पुढे काढला होता. पण त्याचे कारण मागाहून असे सम जले की अमेरिकन मुत्सद्दी मि. टॅफ्ट यानी इंग्लंडला असे बजावले की आय- लेडची व इंग्लंडची भानगड मिटल्याखेरीज अमेरिकन लोकाकडून इंग्लंडला युद्धात मनःपूर्वक मदत होणार नाही. ही गोष्ट स्वाभाविक होती. कारण आय- रिश लोक देशांतर करून अमेरिकेत जाऊन राहिले होते. व ते कायमचे अमे- रिकन झाले तरी आपल्या मातृभूमीवर लक्ष ठेवीत होते. पण हिंदुस्थान हीच हिंदुस्थानची मातृभूमी व वसाहतहि. तेव्हा त्याला बाहेरून कोठून व कशी मदत मिळणार ? पण बाहेरून मदत नाही याच कारणाकरिता आतल्या लोकानीच अधिक खटपट करणे प्राप्त होते. म्हणून काँग्रेसने यात पुढाकार घ्यावा अशी लोकांची अपेक्षा होती. पण काँग्रेसवाल्या पुढाऱ्याना आवडती व बिनहरकत वाटणारी अशी जी गोष्ट म्हणजे विलायतेला डेप्युटेशन पाठविणे ती देखील त्यांच्या हातून घडून येईना. लॉर्ड पेंटलन्ड यांच्या भाषणाचा निषेध काँ. कमि- ट्याकडून होणे जरूर होते तोहि झाला नाही. मद्रासेत मात्र बरीच खळबळ उडाली. सर सुब्रह्मण्यम् अय्यर यानी ताबडतोब असे प्रसिद्ध केले की मी हाय- कोर्ट जज्ज होतो पण त्याहि पूर्वी काँग्रेसभक्त होतो. मला राजकारणातील जबाब- दारी कळते. आणि मी पेंटलन्ड साहेबांच्या भाषणाला उत्तर म्हणून प्रसिद्ध