पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ च्याजवळ कोठे आहे ? विलायतेत आपली एकदोन माणसे कायमची ठेविली पाहिजेत. त्याला खर्च बराच येणार. त्याची व्यवस्था झाली पाहिजे. मद्रासचा संघ व हा संघ मनाने एक आहेत. घटनेने एक नसण्याचे कारण भाषाभिन्नता. स्वराज्य- संघ स्थापन झाल्याबरोबर त्याने सामाजिक औद्योगिक कार्ये हाती घ्यावी असे काही लोक म्हणू लागले. पण असली विविध कामे करणे हे संघाचे ध्येय नाही. व त त्याला शक्यहि नाही. प्रचारकानी निर्भयपणे मतप्रसार करणे आणि लोकानीहि आम्हास स्वराज्य हवे एवढेच म्हणून सभासद होणे इतकीच जबाबदारी आहे. अडाणी मनुष्याला घरचा किंवा गावचा व्यवहार जितका कळतो तितका कळला तरी आमच्या कामाला तो पुरे आहे. " इकडे सरकारचा उलट प्रयत्न म्हणजे त्यानी हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागात संस्थानिकांची भुते उठविली. मद्रासेकडे कोलगोंडे व कुरूपम् या संस्था- नांचे राजे उत्तर हिंदुस्थानात राजा खुशाल पाल सिंग वगैरे लोक होते. मुंबई- इलाख्यात कोल्हापूरच्या महाराजानी हे काम आपल्याकडे घेतले होते. पण राजे व संस्थानिक लोक हे जाहीर रीतीने लोकापुढे येऊन सभा भरवून होमरूलच्या वि- रुद्ध चळवळ करतील हे शक्य नव्हते. ते करण्यास ते प्रवृत्त झाले असते तर त्यांचा मोठेपणा कोणी शिल्लक ठेवला नसता. म्हणून त्यांचे काम चळवळ्या लोकाना चिमटे घेणे व त्याहिपेक्षा म्हटले म्हणजे मिशीला पीळ भरून सरकारला फुकटचा धीर देणे एवढेच होते. इकडे संस्थानिक आतून अशी कारवाई करीत होते व तिकडे मुख्य प्रधान लॉईड जॉर्ज हे स्वयंनिर्णयाचे तत्त्व जोराजोराने प्रति- पादित होते आणि वसाहतींचा उल्लेख करिताना त्यांच्या बरोबर हिंदुस्थानच्या नावाचाहि उल्लेख करीत होते. मे अखेर हिंदुस्थानसरकारने एक ठराव प्रसिद्ध करून असे म्हटले की भारत संरक्षक सैन्याची योजना सफल झाली नाही याचा दोष लोकांच्या पुढाऱ्यावर आहे. हा ठराव म्हणजे दुःखावर डागणीच होय. कारण आधीच या सैन्याच्या योजनेचे नियम सदोष. पुढाऱ्याशी अधिकाऱ्यांची सहकारिता नाही. मागिवली तरी मिळेना. मदत करू का म्हटले तरी नको म्हणत. लष्करी नोकरीतील वरिष्ठ जागा तर होतच पण उत्साहवर्धक असा एक शब्दही नाही. आणि ज्यानी या कामाला लोकांना स्फूर्ति दिली त्यांच्यावर डिफेन्स ऑफ इंडिया अॅक्टाचा सररास प्रयोग करण्यात आला. अशी वस्तुस्थिती असता वरती लोकानाच दोष दिला हे सरकारचे सौजन्य वाखाणण्यासारखे होते ! पण त्यातील एकंदर मर्ग असे की सैन्यात भरती झाली तर हवी पण ती राजकीय दृष्टीच्या लोकाकडून किंवा अशा दृष्टीच्या लोकांची व्हावयाला नको. मग सरकाराला इतर दुसरे लोक हवे होते ते अधिकाऱ्यांच्या जुलमाने मिळतच होते ! सर्व तालुक्यांचे अधिकारी व सर्व संस्थानिक यांच्यावर सैन्यभरतीची जशी काही वर्गणीच बसविली होती. जाणता मनुष्य शिपाई नको. त्याला फक्त सुदृढ अंग व जवळ भरपूर अज्ञान इतके असले म्हणजे झाले.