पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ स्वराज्य संघाचा वाढदिवस १५ ठेवणारा मला एकहि इंग्रज भेटला नाही. पण आमच्यातीलच काही लोक त्याला नावे ठेवतात व त्याला काही अनिष्ट आठवणी चिकटून राहिल्या आहेत असे म्हणतात हे आश्रर्य होय. फ्रेंच राज्यक्रांतीची आठवण होते म्हणून नैसर्गिक हक स्वतंत्रता समानता या गोष्टी कोणी टाकून दिल्या आहेत काय ? होमरूल हा शब्द वापरतो तो केवळ स्वराज्यघटनेची जुनी एक कल्पना सुचण्याकरिता. रक्त- पाताची आठवण व्हावी म्हणून नव्हे. स्वराज्य म्हटले की स्वातंत्र्याची आठवण होते म्हणून नको! होमरूल म्हटला की बहिष्काराची आठवण होते म्हणून नको ! मग आम्ही म्हणावे तरी काय? आमची चळवळ कायदेशीर सनदशीर ठरली आहे एवढे पुरे नाही काय ? शंभर वर्षापूर्वी हिंदुस्थानाला स्वराज्य द्यावयाचे तर कसे द्यावे याची कल्पनाहि आली नसती. पण या अवधीतील अनुभवाने ती कल्पना आता येते. साम्राज्य हे एखाद्या बारीक बंधनाने बांधलेले वसाहतीचे व इंग्लंडचे 'फेडरेशन' झाले आहे. त्यातच हिंदुस्थान सामील व्हावा आणि वसाहती- वसाहतीत जसे फेडरेशन झाले आहे तसे हिंदुस्थानातील प्रांतात व्हावे. " यानंतर चिटणीसानी संघाच्या कामाचा अहवाल सांगितला. त्यावरून असे दिसते की तेव्हा- पर्यंत १४२१८ सभासद नोंदले होते. त्यात शे. ४२ ब्राह्मण व ४३ ब्राह्मणेतर असे असून ३०९ सभासद मुसलमान ११ पारशी व ६७ स्त्रियाहि होत्या. नऊ हजार रुपये सभासदांची फी व सहा हजार रुपये देणग्या मिळाल्या होत्या. मध्यवर्ती कचेरीतून सुमारे पाच हजार आवक व पाच हजार जावक इतका पत्रव्यवहार झाला. अनेक जिल्ह्यातून व्याख्यानमाला चालू होत्या. संघाने ६ मराठी व दोन इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध केली. त्याच्या ७५ हजार प्रतीपैकी ४७ हजार खपून गेल्या होत्या. त्यात टिळकांच्या ज्या व्याख्यानावर खटला झाला त्यांच्या तीन हजार प्रती खपल्या आणि त्यांची गुजराथी व कानडी भाषांतरे छापण्याची योजना झाली. स्वतः वेझट- बाई व इतर काही प्रमुख होमरूलवाले महाराष्ट्र संघाचे सभासद झाले. उलट टिळक हे बाईच्या संघाचे सभासद झाले. अशा रीतीने दोन्ही संघांची चांगली सह- कारिता होती. यानंतर शाखांचे अहवालहि वाचून दाखविण्यात आले. तसेच संघाच्या कार्याला वर्गणी मिळविण्याकरिता शंभर रुपये देणाऱ्या लोकांचा तहाहह्यात सभास- दांचा एक नवीन वर्ग काढण्यात आला. शेवटी समारोपादाखल टिळक म्हणाले “लखनौच्या काँग्रेसला होमरूलर लोक पुष्कळ आले म्हणून तेथे तरी स्वराज्याचा ठराव मंजूर होण्यास जोर आला. काँग्रेस आपल्या ठरावाची अंमलबजावणी स्वतः कोणत्याहि रीतीने करीत नाही. बरे ते न झाले आणि आम्हाला कॉंग्रेसने ममत्वाने वागविले तर आमचे कामहि त्यांचेच आहे. पुढील सालात ५० हजार सभासद व तितकेच रुपये मिळविले पाहिजेत. इंग्लंडातहि काम पुष्कळ करावयाचे आहे.. वसाहतींच्या बरोबरीने बसू म्हणतो पण वसाहतींची संघटना व स्वार्थत्याग आम- टि० उ...१४