पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ होते. निपाणीकर देसाई होते तेव्हा या मुलखातून पेशव्यांच्या लष्करभरती- करिता १०००० सैन्य वेळेस बाहेर पडत असे. आपले घोडे व आपल्या दशम्या घेऊन लोक सैन्याला जाऊन मिळत. पण आज तीच गोष्ट उलटी झाली आहे. आपणाला रंगरूट म्हणून धरून नेतील या भीतीने लष्करी अधिकारी दिसला की लोक पळून जातात. ही गोष्ट अशी का होते हे आमच्या सरकारला कळले पाहिजे. सरकारने आम्हाला इतके परतंत्र करून ठेवले आहे की निपाणीला उत्तम तंबाकू पिकत असता चिरूट इजिप्त देशातून यावा लागतो. पण या सर्व गोष्टी सरकारला लोकानी निर्भीडपणे सांगितल्या पाहिजेत.” व्याख्यानाच्या शेवटी स्वराज्य संघाला ५०० रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. नंतर परत जाताना गुजरांच्या वस्तीत जाऊन चंद्रप्रभु महाराजांचे दर्शन घेऊन टिळक बिन्हाडी परत आले. जैन यतिबरोबर संभाषण करिताना टिळकानी सांगितले की "तुमच्या मंदिरात ५२ तीर्थंकर असतात त्याप्रमाणे या देशात ३०० कोटी तिर्थङ्कार उत्पन्न झाले पाहिजेत. तुम्हा व्यापारी लोकाना धर्माची सवय आहे. पण राष्ट्रीय धर्मांचे पालन- पोषण तुम्ही केले पाहिजे.” अशा रीतीने निपाणी येथील कार्यक्रम संपून टिळक व इतर मंडळी पुन्हा चिकोडीला परत आली. ( ४ ) स्वराज्य संघाचा वाढदिवस स्वराज्यसंघाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र व कर्नाटक यामध्ये चळवळ सुरू झाली व नवीन वर्गणीदार करणे वर्गण्या मिळविणे ही कामेहि सुरू झाली. संघाची पहिली वार्षिक सभा नाशिक येथे ता. १७/१८ मे या दिवशी भरविण्याचे ठरले. कारण त्या सुमारास नाशिक येथे प्रांतिक परिषद भरण्याचे ठरले होते. पुण्यास दोन वर्षापूर्वी १७ की १५ हा वाद निघाला होता. अर्थात नाशिकाला १७ की १९ हा बाद निघावा हे गणिताच्या दृष्टीने बरोबर होते. पण हा वाद फारसा जान्त्रक होण्याचा संभव नव्हता. याचे कारण परिषदेचे काम जरी राष्ट्रीय पक्षाच्या हाती होते तरी परिषदेचे अध्यक्षस्थान श्रीनिवासशास्त्री याना देण्यात येणार होते. ठरल्याप्रमाणे परिषद ता. १७ मे रोजी सुरू झाली. स्वागताध्यक्ष पाटणकर यानी सांगितले की आम्ही नाशिककर या वादात पडू इच्छित नाही. प्रां. कमिटीने १७ वी म्हणा असे ठरविले आहे. आपणास वाटेल तर आपण १९ वी म्हणा. पण कोणीकडून तरी परिषद पार पाडा म्हणजे झाले. अध्यक्ष ना. शास्त्री यांचे भाषण हे होमरूलवर एक समर्पक व सणसणीत ब्या- ख्यानच होते. याहून अधिक सांगण्याचे कारण नाही. परिषदेतील ६ वा ठराव स्वराज्य या विषयावरील बॅ. बॅपटिस्टा स्वराज्यसंघाचे अध्यक्ष यानी मांडिला. टिळकांचेहि या विषयावर भाषण झाले. नंतर ता. १७ मे रोजी हिंदी स्वराज्य- संघाचे पहिले वार्षिक संमेलन मंडपातच झाले. बॅपटिस्टा यानी एकदीड वर्षाच्या कामाचे समालोचन केले. ते म्हणाले, ' होमरूल या शब्दासंबंधाने नावे