पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ कर्नाटकातील दौरा १३ नामदार गोखले याना विलायतेत लोक विचारीत ' ते सारे खरे पण What about Mahommedans ' आज तोहि प्रश्न उरला नाही. म्हणून इकडे हिंदु- स्थानातून व तिकडे विलायतेतून असे इंग्रजावर दुहेरी दडपण पडले तर तुम्ही म्हणता त्यासारखे होऊन जाईल. " आमच्या तारिख १४ रोजी दोन प्रहरी नामदार बेळवी यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य संघाची म्हणून सभा झाली. तीत भाषण करिताना टिळक म्हणाले लीगला नुसते ५००० रुपये हवे असते तर ते कोणी एकट्यानेहि दिले असते. पण मला तसे नको होते. एकेक रुपया देणारे ५००० लोक मला हवे आहेत. त्यात हातात लेखणी धरणाच्या लोकाबरोबर हातात नांगर धरणारे लोकहि पाहिजेत. उद्योग केला तर लोक ह्या संघाचे सभासद होऊ शकतील. 'प्राचामुखी परमेश्वर' ही म्हण आहे. आणि एक वेळ पाच एकत्र जमल्याने जर त्यांच्या तोंडातून पर- मेश्वर बोलू शकतो तर एक हजार लोक सभासद होऊन स्वराज्य मागू लागले तर त्यांच्या तोंडून परमेश्वर ताबडतोब बोलेल की नाही ? पंढरीच्या वारीला दर- वर्षी लाखो लोक जातातच की नाही ? व चार चार आगे कर देतातच की नाही ? हा पंढरीचा वारकरी मी पंढरीस मेलो तर मुक्ति मिळाली असे समजतो. तसेच स्वराज्य मागण्यात मृत्यु आला तर देशाला मुक्ति मिळेल असे तुम्ही लोक का समजत नाही ?" चिकोडी येथील असा हा विविध प्रकारचा कार्यक्रम संपल्यावर टिळ- काना निपाणीस नेण्यात आले. निपाणी हे सत्यशोधकांचे घर अशी त्याची ख्याती. पण ती टिळकांच्या भेटीमुळे बदलली. अवघ्या २४ तासात निपाणी गावाने सर्व तयारी केली. चिकोडीहून निपाणीस जाताना वाटेत खेडी एकवटून पानसुपाऱ्या होत होत्या. रस्त्यांच्या बाजूला घोंगड्या हातरून व किटसनचे दिवे लावून मंडळी वाट पाहात बसली होती. ठिकठिकाणी केळी चुरमुऱ्याचे लाडू व गुन्हाळातील गुळाची साय हे पदार्थ लोकाना वाटण्यात येत होते. निपाणीच्या बाजूचा भाग उसाच्या पिकाकरिता प्रसिद्ध होता. गुन्हाळातील मेवा देणे हा मोठा सत्कार मानला जातो. मिरवणूक व्यंकटेशाच्या देवळाला पोचेपर्यंत मध्यरात्र उल- टून गेली होती. दुसरे दिवशी सकाळी टिळकांच्या अध्यक्षतेखाली खाडिलकरांचे व्याख्यान करण्यात आले. समारोपादाखल बोलताना टिळक म्हणाले "मला हल्ली महात्मा भगवान म्हणण्याचे खूळ लोकानी काढले आहे. पण त्याला माझी हरकत आहे. माझ्या अंगचा मोठेपणा मला इतकाच कळतो की मला जे कळते ते तुम्हाला सागण्याला मी विशेष प्रकारे प्रवृत्त झालो. मनुष्य व पुस्तक दोघातहि ज्ञान भरलेले असते. पण पुस्तक आपण होऊन उठून कोणाकडे जात नाही. मनुष्य जातो व सांगतो. मी मला कळते ते तुम्हाला सांगतो तसेच तुम्हाला ने कळते ते तुम्ही लोकाना सांगा. कळते ते सांगणे हे ज्याला सुचते तोच ज्ञानी. तुम्हाला सांगावयाला आज सुचते ते म्हणजे निपाणीची जुनी आठवण