पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ लो० टिळकांचे चरित्र भाग ३ शिक्षण नाही म्हणून स्वराज्य नाही अशी उलटी सवव सरकार सांगते. तेव्हा शेवटी उपाय हाच की शिक्षणाची सक्ती पाहिजे असेल तर आपण सरकारावर सक्ती करण्याची ताकद अंगी आणली पाहिजे." तारीख १४ रोजी रात्री रा. रामचंद्र धोंडो कुळकर्णी यानी आपल्या शेतात रयतवर्गातर्फे पानसुपारी केली. तिकडे जाताना वाटेत श्रीरामलिंगाच्या देवळात प्रसाद देण्याकरिता टिळकाना नेण्यात आले. कारण या रामलिंगावर चिकोडीच्या लोकानी टिळक तुरुंगातून सुटावे म्हणून सतत अनुष्ठान चालविले होते त्याची आज परिसमाप्ति होती. पानसुपारी झाल्यावर टिळकानी भाषणात सांगितले की "ही पानसुपारी गरीब रयतेतर्फे आहे असे म्हणता याचा मला अर्थच कळत नाही. रयत गरीब व श्रीमंत दोन्ही सारखीच.श्रीमंत रयत लोक युद्धाच्या कामी सरकारला पैसा देण्याला सज्ज झाली. तर गरीब रयत युद्धावर जाण्याला तयार झाली. मुंबईस मी व्याख्यान दिले ८०० लोकानी युद्धावर जाण्याची आपली तयारी दाखविली. सरकार म्हणत होते १००० लोक युद्धावर जाण्याला द्या. आणि एकटा मी हे ८०० लोक देण्याला तयार झालो. पण पैसे दिले माणसे दिली तरी सरकार मात्र अजून हक्क देण्याला तयार नाही. पण सरकारला हे कळले पाहिजे की 'चित्त दिले तरच वित्त मिळेल.' पण चित्ताच्या आधी सरकारला वित्त दिलेत तरी त्यांच्या पेटीत नुसती पिशवी टाकू नका. तर त्या पिशवीला चिठी जोडून त्यात लिहा की आम्ही हे स्वराज्याच्या उपायाना देतो आहो. " याच रात्री ११ वाजता टिळकांच्या अध्यक्षतेखाली पुण्याचे शिवरामपंत परांजपे यांचे व्याख्यान झाले. समारोपाच्या वेळी टिळक म्हणाले " तुमच्या बेळगावास स्वराज्यावर पहिले व्याख्यान दिले. त्याने माझ्यावर तोहमत आली. म्हणून तुमच्या ह्या जिल्ह्यात स्वराज्यावर व्याख्यान देण्याची मोठी भीति वाटते. पण अशी संकटे येणारच. म्हणून लोकांच्या मनातील भीति प्रथम घालविली पाहिजे. बेळगावास दिलेल्या व्याख्यानामुळे मजवर खटला झाला. त्याचा परिणाम मी समजतो की आज होमरूल लीगला ६००० सभासद मिळाले. पण अजून यातील लोक गुप्त पोलिसाला भितात. पण भीति का ? गुप्त पोलिस हे जसे गच्छ- रसाहेबांची पाठ राखतात तशी तुमची राखतात असे का समजत नाही ? भिण्याची वेळ गेली. आता न भिण्याची आली आहे. आम्ही तर आता स्वराज्याची मागणी इंग्लंडला नेऊन भिडविणार आहोत. पूर्वी मीहि डेप्युटेशन पाठविण्याच्या विरुद्ध होतो. पण आज पाठविण्याला तयार झालो तो तरी का? भीक मागण्याकरिता नव्हे, तर विलाय- तेत युद्धामुळे लोक खडबडून जागे झाले आहेत. आमचे डेप्युटेशन जाऊन सांग - णार की हिंदुस्थानाला स्वराज्य देण्यात तुमचा फायदा आहे. हिंदुस्थानला परतंत्र ठेवण्यात ब्रिटिश सरकारचा किती तोटा झाला हे सांगण्याला आमचे डेप्युटेशन जाणार. १० वर्षापूर्वी होमरूलची मागणी कोणाला सुचली असती? पण कालाने सर्वा- नाच भरंवसा उत्पन्न होतो. म्हणून मी म्हणतो ६००० सभासद झाले हेहि थोडेच. लखनौ येथे हिंदुमुसलमानांची एकी झाल्यापासून आणखी एक प्रश्न सुटला आहे.