पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ कर्नाटकातील दौरा ( ३ ) कर्नाटकातील दौरा ११ टिळक लखनौच्या काँग्रेसनंतर मुद्दाम कलकत्याला जाऊन दुखणाईत मोतीबाबूंची भेट घेऊन आले. पण पुन्हा अवघ्या चार महिन्यातच त्याना दुस- यांदा कलकत्यास जावे लागले. तारिख ४ एप्रिल १९१७ रोजी कलकत्ता येथे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची सभा भरविण्यात आली होती. कमिटीने विलाय- तेस डेप्युटेशन पाठविण्याचे ठरविले. शिवाय असेहि ठरविले की लखनौ येथे मंजूर झालेल्या योजनेच्या अनुरोधानेच त्यातील लोकानी खटपट करावी. मन मानेल त्याप्रमाणे बोलू नये. हे झाले खरे, पण डेप्यूटेशन मधील लोकांची नावे काही अशी योजिली होती की त्यातील काही गृहस्थ जाणे अशक्य होते. ही सभा संपून टिळक परत आले. ते पुप्यास न उतरता परस्पर तारिख १२ रोजी चिकोडी येथे भरलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या सभेकरिता गेले. सकाळी गावच्या वेशीपासून ठरा- विक रीतीने मिरवणूक झाल्यावर सायंकाळी पाच वाजता सभेला सुरवात झाली. येथील समारंभाचे पुढारीपण कै. सखारामपंत कुळकर्णी वकील याजकडे होते. सभेचे अध्यक्षस्थान दादासाहेब करंदीकर यास देण्यात आले होते. सभेचे काम दोन दिवस चालले. शेवटी टिळक सभेला आल्याबद्दल गंगाधरराव देशपांडे यानी टिळकांचे मोठ्या प्रेमळपणाने आभार मानले. उत्तरादाखल केलेल्या भाषणात टिळकानी जनतेला उद्देशून प्रवृत्ति व निवृत्ति यातील भेदाचे विवेचन केले. टिळक म्हणाले " प्रवृत्ति हाच खरा मनुष्यधर्म होय. आपल्या समाजात नुसतीच निवृत्ति असती तर महाराष्ट्र निर्माण झाले नसते. ज्याना काही करिता येत नाही व केले तर डोके आपटण्याची भीति ज्याना वाटते तेच निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात. मी प्रवृत्तिपर होतो म्हणूनच तुम्ही बोलावल्याबरोबर येथे आलो. आणि म्हणूनच तुम्ही माझे आभार मानता ही चूक करिता असेच मी तुम्हाला सांगतो." तारीख १३ एप्रिल रोजी जिल्हा सभा निमित्त जमलेल्या समाजाचा फायदा घेऊन बेळगाव जिल्ह्यातील एक मराठा जातीचे पुढारी गृहस्थ बळवंतराव माने यानी मराठा शिक्षण परिषद भरविली होती. मराठा समाजाला टिळकांचे विचार ऐकवावे म्हणून त्यानी हा योग आणला होता. आपल्या भाषणात टिळकानी सांगितले की “ मी शिक्षणाचे कार्य करण्या- पासूनच सार्वजनिक कार्याला प्रारंभ केला होता. देशात शिक्षणाचा प्रसार सार्वत्रिक करणे हे सरकारचे काम आहे. लोक करून ते किती करणार ? शिक्षण दिले तर लोक हक्क मागू लागतील अशी सरकारला भीति ! पण आम्ही उघडच सांगतो की आम्हाला हक्क मागावयाला शिकावयाचे आहे म्हणूनच शिक्षण द्या. माझ्या हाती उद्या स्वराज्य आले तर मी पहिल्याने शिक्षण सक्तीचे व मोफत करीन. जुन्या काळी शिक्षण सरकार देत नव्हते. तेव्हा साधुसंतानी राष्ट्राला शिक्षण देण्याचे काम केले. आता या शिकविणाराना भगवद्भक्त मानतात. आजच्या सामाजिक शिक्ष- काना देशभक्त म्हणतात इतकाच फरक. शिक्षण द्यावयाचे ते न देऊन वरती