पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० लो० टिळकांचे चरित्र भाग ३ तले. सभेत मनमोहनदास रामजी खाडिलकर हॉर्निमन वगैरे लोकांची याच अर्थाची भाषणे झाली. खाडिलकर हे म्हणाले की रणांगणावर घालवलेला काळ अंतःकरणाची निर्मलता उत्पन्न करतो. तेव्हा होमरूलवाल्यानी समाजसुधारकानी व धार्मिकसांप्रदायिकानीहि सैन्यात शिरावे. मनमोहनदास व टिळक या दोघानीहि आपल्या भाषणात आपला एकेक मुलगा आपण लष्करात पाठविण्यास तयार आहो असे सांगितल्याने लोकास विशेष उत्साह वाटला. सभेचे शेवटी व नंतर मिळून ८०० लोकांनी आपली नांवे नोंदविली त्यात पुष्कळ पदवीधरहि होते. आणि काही कॉलेजानी आपल्या स्वतंत्र कंपन्या उभारण्याचे ठरविले. पण मौज ही की ज्या खाडिलकरांनी मुंबईच्या सभेत उत्साह- पर व उत्तेजनपर भाषण केले तेच बेळगावास या कामाकरिता गेले असता कले- क्टरसाहेबानी स्टेशनावर उतरताच तुम्ही चिथावणीचे भाषण करू नये अशा ठरीब अर्थाचा मनाई हुकूम दिला. पण त्याहून मौज ही की ठरलेली सभा होऊन खाडिलकराऐवजी त्यांच्यादेखत त्याना बोलावयाचे होते ते सर्व गंगाधरराव देश- पांडे बोलले. याच अर्थाची व्याख्याने तिकडे सुरेंद्रनाथ बानर्जी मोतिलाल घोष शिवस्वामी अय्यर नटेसन कस्तुररिंग अय्यंगार निळकंठराव उधोजी डॉ. मुंजे नारायणराव वैद्य वगैरेनी अनेक प्रांतात अनेकानी केली. त्यांच्यावर कोणीच नोटीस बजाविली नाही. खरोखर खाडिलकर यांच्यावरहि बजावण्याचे खरोखर कारण नव्हते. पण धारवाडास ज्या हुकुमाची फजीति झाली तो हुकुम कसा तरी जागृत ठेवावा आणि आपली अब्रू जाऊ देऊ नये या हेतूनेच अधिकान्यानी ठराविक शब्दांचा हुकूम जागृत ठेवला होता. पण तसे म्हणावे तर खाडिलकर याना धारवाड येथे बोलू दिले. याचे तात्पर्य इतकेच की सरकारचे ठराव व धोरण असे काही नव्हते. पंण काहीतरी अनिष्ट घडत आहे म्हणून दडपशाहीची हालचाल ठेविली पाहिजे अशा समजुतीने अधिकारी लोक मनास येईल तसे वागत होते. याचा कदाचित एक खुलासा कॅपिटल पत्नात आला होता. या पत्रात असे लिहिले होते की स्वराज्यसंघवादि लोक लष्करात शिरणार ते चांगल्या हेतूने नाही म्हणून त्याना दाखल करून घेऊ नये. पण यानेहि खरोखर खरा खुलासा होत नव्हता. कारण वर दिलेल्या नावात होमरूलर असे कित्येक होतेच. शिवाय जो मनुष्य लष्करात जाऊन सामील होणार त्याच्या डोक्यावर होमरूलर अशी चिट्टी थोडीच चिकटविलेली असणार ? होमरूलर ही काही जात नाही किंवा लांबी रुंदी व उंची मोजण्याचे ते कोष्टक नाहीं. ती एक फक्त भावना आहे. तो एक स्वभाव आहे. ती एक वृत्ती आहे. तेव्हा ती कोठे असेल नसेल येणार नाही. असो. लष्करी शिक्षणाच्या या चळवळीबरोबरच बॉयस्काउटच्या स्थापनेचा प्रश्नहि कायदे कौन्सिलात निघाला होता.