पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ लष्कर भरतीचा उपदेश आहो. पण रुसून बसण्याची मात्र ही वेळ नव्हे. सुशिक्षित वर्गाने अडून बसू नये कारण आपल्या आकांक्षा आज नाही उद्या पूर्ण होतील. सर्व गोष्टी एकदम मनासारख्या होत नसतात. लष्करात आपण शिरलो तर या जागा अधिक हक्काने मागता येतील. देशाचे संरक्षण करण्याला जर आपण तयार नाही तर स्वराज्याच्या नुसत्या गप्पा ठोकून काय उपयोग ? सरकाराला आज सैन्याची जरूरी आहे हे खरे पण हे उघडलेले दार त्याना पुढेहि मोकळे ठेवावेच लागेल." टिळक अशा रीतीने लोकाना उपदेश करीत असता सरकार मात्र त्याना अधिकाधिक प्रतिबंध घालीत होते. टिळक हालचाल करू लागले असे पाहून बेझन्टबाईप्रमाणे त्याना पंजाबात जाण्याची बंदी करण्यात आली. लखनौच्या राष्ट्रीय सभेनंतर टिळकानी जे दौरे काढले त्याचा सरकाराला विषाद वाटला. ता. १३ फेब्रुवारी रोजी डिफेन्स ऑफ इंडिया अॅक्टाखाली हूकूम काढून पंजाब सर- काराने असे जाहीर केले की "पुण्याचे चित्पावन ब्राह्मण टिळक यांचा पंजाबात येण्याचा आणि सार्वजनिक सुरक्षिततेस धोका येईल अशा रीतीने वागण्याचा इरादा आहे असे समजते. तरी त्यानी पंजाबात पाऊल ठेवू नये. तसे केल्यास तीन वर्षांची कैद व दंड याना ते पात्र होतील. " वास्तविक पंजाबात जाण्याचे हल्ली टिळकाना कारण नव्हते किंवा उद्देशहि नव्हता. पण कर्मधर्मसंयो- गाने ज्या दिवशी सैन्यात शिरण्याचा उपदेश ते लोकाना जाहीर सभेत करीत होते त्याच दिवशी अशा प्रकारची नोटीस त्याना लावण्यात आली ! या गोष्टीने सरकारचे किती हसू झाले असेल हे सांगावयास नकोच. पुढच्याच आठवड्यात दिल्लीला जाण्याची मनाई टिळकाना करण्यात आली. त्यात नंतर टिळक दिल्लीस येऊन गेले अशी खोटीच गोष्ट लिहिली होती. शिवाय असे हुकुमावर हुकूम काढल्याने सैन्यात शिरण्याचा जो उपदेश टिळक करीत होते त्यावर थंड पाणी ओतल्यासारखे होणार होते. पण सरकार गोंधळून गेले होते आणि त्याच्या कृतीत काही मेळ राहिला नव्हता. इकडे लष्करभरतीचा जुलूम अधिकाऱ्यानी सुरू केला होता. त्यामुळे लोक असंतुष्ट होत होते. आणि इकडे टिळक आपण होऊन लोकाना खुषीने लष्करात शिरा असेसांगत होते. त्यांच्यावर नोटिसा बजावण्यात येत होत्या. पण टिळकानी हे काम थांबविले नाही. ता. २ मार्च रोजी मुंबईस शांतारामाच्या चाळीच्या पटांगणात फार मोठी सभा भरली तिला टिळक गेले व अध्यक्ष झाले. सभेत गांधी यांचा सैन्यात शिरण्याविषयोचा संदेश वाचून दाखविण्यात आला. पूर्वीच्या आठवड्यात कौन्सिलात लष्करी शिक्षणाचे बिल निघाले तेव्हा भारत सेनापतीनी मोठेसे उत्तेजनपर भाषण केले नव्हते. "तथापि थोडी मिळालेली संधी आपण दवडू नये लष्करात राबावे लागते. तरी त्यात व्यक्तीचे व राष्ट्राचे हितच आहे. लष्करी शिक्षण घेतलेले लोक राष्ट्रात वावरू लागतील तर सरकारच्या मनावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. होमरूल व लष्करी अधिकाराच्या जागा पुढे तरी मिळाव्या अशी आकांक्षा असेल तर आजच सैन्यात शिरा" असे टिळकानी सांगि