पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ३ कळून आली आहे की अमुकच जात शिपावपणाला योग्य या म्हणण्यात अर्थ नाही. सर्व हिंदी लोकाना लष्करी शिक्षण मिळेल तर साम्राज्यांतर्गत हिंदुस्थाना- कडे डोळा उघडून बघण्याची कोणाची छाती होणार नाही. हल्ली हे द्वार सर- काराने मोकळे केले आहे तेव्हा हिंदी तरुणानीहि त्याचा फायदा अवश्य घ्यावा. " मुख्य ठराव मांडताना टिळक म्हणाले की "राष्ट्रीय सभा सुरू झाल्यापासून आपण ही मागणी एकसारखी करू लागलो आहो. हिंदुस्थानावर परचक्र आले तर जपा- मची मदत घेण्याला इंग्लंड तयार पण हिंदुस्थानच्या लोकाना शिकवून तयार करून त्यांचे सैन्य सिद्ध करण्यास इंग्लंड तयार नाही. ता. २१ फेब्रुवारी रोजी कायद्यात दुरुस्ती होऊन हिंदी लोकाना हा नवा हक्क मिळणार आहे. म्हणून हिंदी तरुणानी या संधीचा फायदा अवश्य घ्यावा. स्वराज्याचे हक्क मागण्याला आम्ही तयार होताना लष्करी देशसेवेचा हक्कहि आपण मागून घेण्याला व बजा-. aण्याला तयार असले पाहिजे. स्वयंसैनिक होण्याविषयी फारशा अटी आपण प्रथम घालून चालणार नाहीत. अशा कामी म्हणजे लष्करी शिक्षण संपादन करण्यात हिंदी तरुणांचे काही दिवस गेले तरी ते फुकट गेले असे मानू नये. आम्ही आपल्या इच्छेने स्वयंसैनिक न झालो आणि उद्या सरकाराने सक्तीचा कायदा केला तर आम्ही लष्करात दाखल होऊच की नाही ? आज युद्धापुरते हे हक्क दिले तरी पुढे हि ते कायम होणे हे आमच्यावरच अवलंबून आहे. महाराष्ट्र कर्नाटकात वीस हजार स्वयंसैनिक मिळण्याला अडचण पडू नये.” या ठरावाला अनुमोदन देताना शिवरामपंत परांजपे म्हणाले की "लोकांची हत्यारे काढून घेण्याची दृष्टी बदलून ती पुनः काही आमच्या हाती देऊन युद्धकला शिकविण्याचे सरकाराने मनात आणले आहे. इतर काही गोष्टी असल्या तरी कोणत्याहि प्रकारचे किल्मिष मनात न धरता मातृभूमीच्या संरक्षणार्थ सैनिक होण्याचे पवित्र कर्तव्य आपण पार पाडले पाहिजे. " हीच गोष्ट लोकांच्या मनावर आणखीहि पटविण्याकरिता स्वतः टिळ- कानी ता. २७ फेब्रुवारीच्या केसरीत मुद्दाम एक अग्रलेख लिहिला. त्याचे अब- तरण असे होते. यच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभते युद्धमीदृशम् या लेखात ते म्हणतात "परतंत्र हिंदुस्थानातहि युद्धाने जागृति झाली आहे. बंडाच्या भीतीमुळे सरकाराने आजवर हिंही लोक लष्करी शिक्षणातून वगळले. पण सरकार दुसऱ्यावर नेहमीच भिस्त किती ठेवणार ? म्हणून हिंदुस्थानचे रक्षण हिंदी लोकाकडूनच करवावे अशी बुद्धी काळाच्या ओघाने का होईना सर- काराला झाली आहे. लप्करी अधिकाराला जागा मिळत नाहीत म्हणून सैन्यात शिरण्याला हुरूप वाटत नाही हे खरे. पण यामुळे कर्तव्यपराङ्मुख होणे योग्य नाही. हा दोष सुधारण्याकरिता आम्ही सरकाराकडे मागणी करण्याला तयार