पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ मंडालेहून उपयोग प्रसिद्धपणे केला नाही व ही अवघड जबाबदारी आपणावर घेतली नाही. तात्पर्य, टिळक पुढेमागे लवकर सुटणार या ठोकळ अनुमानाखेरीच कोणास काहीच म्हणता येत नव्हते. इकडे सरकारने आपल्या मनाशी सुटकेची तारिख निश्चित करून टिळकाना आणण्याकरिता पुण्याहून पोलीस इन्स्पेक्टर सदावर्ते याना मंडालेस पाठविले होते. त्यानी ता. १७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास टिळकाना पुण्यास आणून गायकवाडवाड्याच्या दरवाज्यापाशी अवचित उभे केले. दरवाजा लाऊन देवडीवर भय्या निजला होता. पण टिळकाना त्याने न ओळखल्यामुळे तो एकदम दरवाजा उघडीना. तेव्हा सदावर्ते याना व स्वतः टिळकाना सर्व खुलासा करावा लागला तेव्हाच दरवाजा उघडला जाऊन स्वतःच्या वाड्यात टिळकांचा प्रवेश झाला. टिळक वाड्यात गेल्यावरच धोंडोपंत विध्वंस याना ही सुटकेची बातमी समजली. लगेच चोहोकडे दिवाबत्ती होऊन बैठका घातल्या आणि हाताशी मिळाली ती एक दोन माणसे मित्रमंडळीना ही आनंदाची खबर कळविण्याकरिता पिटाळण्यात आली. तास अर्ध्या तासात माणसांची रीघ सुरू झाली. या गर्दीने पूर्वीच्या सहा वर्षा - तल्या शून्याकाराचा सर्व बचपा काढला. ज्याने यावे त्याने एकवार पायावर डोके ठेवून दूर वसावे असे होता होता माडी भरून गेली. शेवटी पहाटे चार वाज- ण्याच्या सुमारास मंडळी घरोघर पाठवून टिळकानी विश्रान्ती घेतली. दुसरे दिवशी सकाळी टिळक सुटल्याची वार्ता सर्व गावभर पसरली बाहेर तारा व पत्रे जाऊ लागली व बाहेरून येऊ लागली. अभिनंदनाच्या पत्रोत्तराकरिता कचेरी दोन दिवस एकसारखी खुली होती आणि आप्त स्नेही वगैरे तर काय पण अगदी अनोळखी स्त्रीपुरूषहि वाड्यात येऊन दर्शन घेऊन जात. प्रथम १-२ दिवस ' दर्शन' देण्याच्या उद्योगाशिवाय टिळकांना दुसरा उद्योगच करिता आला नाही पुढेहि काही दिवस दिनचर्येतले ते एक ठराविक काम होऊन बसले होते. शनिवार ता. २० रोजी सार्वजनिकसभेमध्ये अण्णासाहेब पटवर्धन यांच्या अध्य- क्षतेखाली सभा भरून गायकवाडवाड्यात पुण्याचे नागरिकानी त्यांस जाहीर पान- सुपारी करावी व सुटकेबद्दल आनंद प्रदर्शित करावा असे ठरले. त्याप्रमाणे रविवारी सायंकाळी सहा वाजता गायकवाडवाड्यात पानसुपारी देण्यासाठी जाहीर सभा भरली होती. साडेचार पासूनच मंडळी येण्यास सुरवात झाली व सहा वाजण्याच्या सुमा-- रास वाड्यातील मैदान गच्च भरून गेले. या समारंभास नागपूर वऱ्हाड खानदेशः नाशिक सोलापूर नगर बेळगांव बगैरे दूरदूरच्या ठिकाणाहून मंडळी आली होती. प्रेक्षक समूह सुमारे पाच सहा हजारावर होता. सवासहा वाजता उमरावतीचे दादासाहेब खापर्डे, रा. ब. चिंतामणराव वैद्य, सातारचे दादासाहेब करंदीकर नगरचे बाळासाहेब देशपांडे प्रो. बिजापूरकर बगैरे मंडळी बरोबर घेऊन लोक- मान्यानी पानसुपारीच्या जागेत पाऊल टाकताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व " टिळक महाराज की जय" असा जयघोष करून लोकानी त्यांचे स्वागत केले. कं. म. म. द. वा. पोतदाथ