पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ लष्कर भरतीचा उपदेश ७ पात्रात दहनभूमीवर त्यांच्या समाधीदाखल एक देऊळ उभारले व त्यांचा वार्षिक पुण्यतिथीचा समारंभ पुण्यास दरसाल होत असतो. अण्णासाहेब पटवर्धनांचे चरित्र अनेक दृष्टींनी बोधप्रद आहे. या चरित्राचा प्रारंभ तेजस्वी प्रवृत्तिमार्गात आणि शेवट निवृत्तिमार्गांत झाला. पूर्ववयांत हाती घेतलेले अचाट उद्योग फस- ल्यामुळे ते निराश झाले. निराशेचे परिणाम जगात सर्वावर सारखेच होत नाहीत. कित्येकांच्या मनोरचनेत दैववादित्व हे कमानोतील मुख्य म्हणजे चावीच्या दग- डाप्रमाणे गुंतलेले असते आणि त्याला धक्का बसल्याबरोबर त्यांचा प्रवृत्तिमार्ग ढासळून कोसळून पडतो आणि ते निवृत्तिमार्गी बनतात. पुढेहि त्यानी देशभक्ति व राजकारणाची चौकशी कायम ठेवली होती. परंतु प्रत्यक्ष उद्योगात ते पडत नसत. धार्मिक कर्मकांड त्यानी पुढे स्वीकारल्यामुळे राजकारणाचे कर्मकांड त्याना . झेपेनासे झाले. म्हणून ते राजकीय पुढारी बनले नाहीत. कर्मकांड अप्रिय वाट- ल्यामुळे अस्सल परमार्थ ज्ञानी देखील लोकांच्या समजुतीने पण अन्यायाने नाहित- कांच्या सदरात ढकलले जातात. त्याचप्रमाणे अस्सल स्वदेशाभिमानी लोकहि राजकीय कर्मकांड अप्रिय झाल्यामुळे कर्त्या मुत्सद्यांच्या सदरातून वगळले जातात. धार्मिक आचारात अदृश्य झालेली स्वदेशभक्ति आणि देशभक्तीच्या नित्यउपा- सनाविधीत अदृश्य झालेली धर्मश्रद्धा या दोन्ही गोष्टी सूक्ष्मभेदी प्रेक्षकाला मात्र दिसतात. दैवगतीचा बांध आडवा आल्यामुळे अण्णासाहेबांचे चरित्र अपेक्षेहून फार वेगळे झाले. घाटमाथ्यावर पुष्कळ ठिकाणे अशी दाखविता येतात की जेथे एका अंगुलीच्या अंतराने पडलेले निम्मे पाणी शेवटी पूर्वसमुद्राला तर निम्मे शेवटी पश्चिमसमुद्राला जाऊन मिळालेले असते. क्रियात्मक राजकारण व क्रिया- त्मक परमार्थ यांचीहि गोष्ट अशीच आहे. अण्णासाहेबांच्या विषयी टिळक असे म्हणत की हा या काळचा पुरुष नव्हेच. जुना ऐतिहासिक काळच त्याना योग्य होता. हिंदुस्थान हे इंग्लंड असते तर माधवराव रानडे हे ग्लॅडस्टन होऊ शकते हे जितके खरे आहे तितकेच ही दुसरी गोष्ट खरी आहे की पुणे जुन्या काळचे पॅरिस असते तर अण्णासाहेब पटवर्धन हे कार्डिनल रिचल्यो झाले असते. किंवा पुणे जर जुने विजयनगर असते तर अण्णासाहेब विद्यारण्य किंवा माधवाचार्य झाले असते. (२) लष्कर भरतीचा उपदेश १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात ता. १७ रोजी पुण्यास एक विशेष ध्यानात ठेवण्यासारखी जाहीर सभा भरली. हिंदी लोकाना स्वयंसैनिक होण्याचे हक्क दिल्या- बद्दल सरकारचे अभिनंदन करणे हा सभेचा हेतू होता. प्रि. रघुनाथराव परांजपे यांना अध्यक्ष नेमले होते. ते प्रास्ताविक भाषणात म्हणाले "अँग्लो इंडियन युरोपिअन नेटिव्ह विश्वन पारशी आणि निजामशाहीतील वन्हाड याना स्वयंसैनिक होण्याचे हक्क होते. हिंदु लोक मात्र त्यातून वगळले गेले होते. हिंदु लोकाना अलीकडे लष्करी शिक्षण मिळत नसले तरी त्यांचे क्षात्रतेज शिल्लक आहे. युद्धावरून ही गोष्ट टि० उ...१३