पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ३ उत्तम कोणता ? नुसते लोणी कापले तर तो कनिष्ठ पेन्सिल करील तर तो मध्यम व पैसा तोडील तर तो उत्तम. ज्ञानाचेहि असेच आहे " नागपूर वन्हाड प्रांता- तील या दौऱ्याला उद्देशून नागपूरच्या महाराष्ट्र पत्राने असे लिहिले की " टिळ- कांच्या शब्दाकरिता काय वाटेल ते करू असे म्हणणारे व त्याप्रमाणे खरोखर करतील असे लोक आमच्या ह्या प्रांतात खचित सांपडतील. " तुरुंगातून सुटून आल्यावर या प्रांताला टिळकानी भेट देऊन राजकारण गीताधर्म शिकविला व त्यामुळे ताम्हणकर कवीने म्हटल्याप्रमाणे " कर्मयोग शिकवाया की हा स्वये कृष्ण आला । रामदास की पुन्हा पातला असा भास झाला. 33 ता. २८ जानेवारी रोजी टिळकांच्या वाड्यांत स्वराज्यसंघाची सभा भरली. तीत तोपर्यंतच्या कामाचा अहवाल वाचून दाखविला. त्यावरून असे दिसून आले की या संघाच्या सहा शाखा स्थापन झाल्या. तीनहजाराहून अधिक सभासद झाले आणि वर्गणी व देणगी मिळून सुमारे सात हजारांची रक्कम जमली. पुढील काम करण्याकरिता प्रचारक नेमावे व अर्ज तयार करवून विलायतस संघाचे शिष्टमंडळ पाठविण्याकरिता आणखी वर्गणी गोळा करावी असेहि ठरले. ता. २९ रोजी टिळकांच्या अध्यक्षतेखाली किर्लोस्कर थिएटरात माधवरावजी अणे यांचे व्याख्यान झाले. तीत त्यानी सांगितले की "दर दहा वर्षांनी आपल्या आकांक्षेचे पाऊल पुढे पडत आहे व त्याप्रमाणे उद्योगहि वाढत आहे. साम्राज्याच्या गर्भाशयात समाविष्ट झालेल्या वसाहती बाहेर पडून खेळू बागडू लागल्या आहेत. तसेच आपणहि करावे असे हिंदुस्थानाला वाटू लागले आहे. पूर्वी बळीराजाने विश्वजित यज्ञ करून दानाचा संकल्प सोडला तेव्हा बटु वामन त्रिपादभूमि मागण्याकरिता तेथे गेला. त्याप्रमाणे क्षात्रदीक्षा घेऊन आरंभिलेल्या युद्धाचा यज्ञ संपवून इंग्लंड हे दानाला सिद्ध होईल तेव्हा हिंदुस्थानच्या बटुवामनानेहि त्रिपाद भूमि मागण्याकरिता उपस्थित झाले पाहिजे. त्या दानप्रसंगी शुक्राचार्य आडवे आले. तेव्हा त्यांची जी गत झाली तशीच मॅस्टन मॅरिस कटींस व इतर लोक आमच्या आड येत आहेत त्यांचीहि होईल. बळीने वामनाला त्रिपादभूमि देताना पाताळातील आपल्या राज्याचे रक्षण करण्याचे अभिवचन त्यांजकडून घेतले त्याप्रमाणे आम्हाला स्वराज्य मिळेल तर आम्हीहि साम्राज्याचे रक्षण करण्यास तयार आहो अशी जामिनकी आमच्या पुरती देऊ." तिकडे मद्रासेस बेझंटबाईना सरकारचा विरोध वाढत होता. त्याना मुंबई इलाख्यात येण्याची बंदी झाली होती. तशीच मध्यप्रांतातहि जाण्याची झाली. त्यांचे शिष्य वाडिया यांच्याहि भाषणाला मनाई झाली. तेव्हा त्यानी आपले भाषण छापून प्रसिद्ध करण्याचे ठरविले. पण त्यालाहि मनाई झाली. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात टिळकांचे एक परमस्नेही पुण्याचे डॉ. अण्णासाहेब पटवर्धन हे वारले. त्यांची लोकप्रियता अलोट असल्याकारणाने त्यांच्या स्मशानयात्रेचा समारंभ अपूर्व झाला. व त्यांच्या भक्तांनी मुठानदीच्या .