पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ लखनौ कॉंग्रेसनंतरचा दौरा घरात शिरण्याचे प्रयत्न आम्ही केले. पण प्रत्येक खिडकीला काच. तेव्हा १०- २० खिडक्या फोडण्याचा खटाटोप करण्यापेक्षा एकदम दरवाजावरच हल्ला केलेला बरा. पाने तोडून झाड कवजात येत नसते. त्याचा बुंधा काढावा लागतो. च वेळी मुळ्यानाहि हात घालावा लागतो. " अकोलेकरांचा उत्साह तरी अवर्ण- नीयच. स्टेशनवर अण्णासाहेब महाजनी रा. ब. दामले वगैरे परपक्षातील मंडळीहि सत्काराला हजर होती. बरोबर महाजनीना घेऊन टिळक गाडीत बसून किट- सनच्या दिव्यांच्या संकेतून मुक्कामाला पोचले. अकोल्यास पाण्याची ओरड. पण वनवासात दूधभात मिळावा त्याप्रमाणे या मुक्कामात टिळकाना तेथील बोटिंग- क्लबच्या होडीतून फिरावयास मिळाले. टिळक डेक्कन कॉलेजमध्ये होते तेव्हा वोटिंग क्लबची चैन नव्हती. फक्त पोहण्याला नदी होतो. ही गोष्ट आटवून टिळक म्हणाले " माझ्या वेळी कॉलेजात बोटिंग क्लब असता तर आज मी तुमच्याबरोवर वल्ही मारून दाखविली असती." येथील मुक्कामात तेलाचे कारखाने गिरण्या वगैरे पाहून झाल्यावर तारीख १२ रोजी अकोला येथील वकील व दादासाहेब खापड्यांच जिवलग स्नेही व्यंकटराव देसाई यांचे घरी पानसुपारी झाली. 'होमरूल लोग ' करिता लोकानी दोन अडीचशे रुपये वर्गणी दिली. सायंकाळी शेट रामरतन यांची पानसुपारी घेतल्यावर टिळक आगगाडीत चढले. आणि आगगाडीत निलंब मलकापूर वगैरे स्टेशनवर मंडळींच्या गाठी घेऊन पुण्याकडे परत आले. टिळक अकोल्याला यापूर्वी १९०८ साली म्हणजे सुरतेच्या राष्ट्रीय सभेनंतर गेले होते. त्या गोष्टीची आठवण होऊन त्यानी या खेपेस अको- ल्याच्या लोकाना असे सांगितले की " सुरतस उत्पन्न झालेला गैरसमज सर्वांचाहि आता निघून गेला. फक्त सरकारचा मात्र गैरसमज अजून गेला नाही त्यामुळे सहा वर्षात तुमची गाठ घेता आली नाही. सरकार देखील स्वराज्य देऊ म्हणते. ती मागणीहि आता कायदेशीर ठरली आहे. पण सरकारचे म्हणणे असे 'स्वराज्य मागा. पण मागताना भाषा मात्र मोजकी वापरली पाहिजे. ' मनुष्याला फळ खावयाला द्यावयाचे. पण बजावावयाचे की दातहि न लावता फळ खा. शेक्स- पिअरच्या 'मचंट ऑफ व्हेनिस' नाटकातील न्यायमूतानी शायलॉकला करारा- प्रमाणे एक अच्छेरभर मास त्याच्या कर्जदाराच्या काळजातील देऊ केले. पण सांगितले की ' कराराने मास देण्याची शपत होती रक्त देण्याची नव्हती. तेव्हा रक्ताचा एकहि क्षेत्र न सांडता आपले मास काढून घ्या.' याच रीतीने आम्ही सरकारचे मन दुखवेल असा एकहि शब्द न बोलता स्वराज्य मागावयाचे. अको- ल्याच्या मुक्कामात तारीख १२ रोजी एकाने सयमक वर्णन केल्याप्रमाणे सोवळे सरकारी नोकर व कोवळे शाळेतील विद्यार्थी यांचेकरिता जोगळेकर यांच्या मळ्यात टिळकांचे गीतारहस्यावर प्रवचन झाले. त्यात त्यानी मुख्य विषय हा सांगितला की ज्ञान्याने आपली कसोटी व्यवहार करून दाखविली पाहिजे. नुसत्या ज्ञानाच्या बडबडीने त्याचा परिक्षा पास होत नाही. ते म्हणाले " चाकू