पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ३ मेजवानी झाली व तेथूनच मंडळी स्टेशनवर गेली. कर्मधर्मसंयोगाने टिळक जाणार त्याच गाडीला चीफ सेक्रेटरी नामदार स्टोकॉक आले होते. त्याना टिळ- कांच्याकरिता जमलेल्या गर्दीमधून स्टेशनाच्या बाहेर पडणेहि मुष्किलीचे झाले. आणि टिळकांच्या सत्काराचा हा समारंभ उभे राहून डोळ्यानी पाहण्याची आपत्ति त्यावर आली. दादासाहेब खापर्डे नागपुरासच मागे राहिले. आणि श्री. माधवरावजी अणे व अण्णासाहेब बापट हे त्याना घेऊन यवतमाळकडे रवाना झाले. ठिकठिकाणी वाटेतील स्टेशनवर पानसुपाऱ्या होतच होत्या. तारीख ८ रोजी सायंकाळी टिळक धामणगांव स्टेशनला पोचले. यवतमाळकडे टिळकांची १०-१२ वर्षानों ही दुसरी फेरी होती. धामणगावच्या व्यापारी मंडळीनो काही वेळ ठेऊन घेऊन सत्कार केल्यावर टिळक यवतमाळकडे निघाले. गावच्या शिवे- पाची हजारो लोकानी मोटारीला अडविले. तेथेहि जवळच्या भिकाजीपंत शेवडे यांच्या कपाशीच्या कारखान्यात धूळभेटीचा समारंभ झाल्यावर रात्र पडल्यावर दुतर्फा चिरांगणातून मिरवणूक गावात गेली. पौर्णिमा असताहि लोकानी दिपो- त्सवाची हौस पुरवून घेतली. यवतमाळ येथे टिळकांचा मुक्काम त्यांचे लहानपणचे स्नेही अण्णासाहेब बापट वकील यांचे बंगल्यावर होता. दुसरे दिवशी दोन प्रहरी इजारदार असोसिएशनच्या दिवाणखान्यात व जिल्हासभेच्या दिवाणखान्यात पानसुपाऱ्या झाल्या. वकील लोकांच्या कारकूनानीहि एक वेगळीच पानसुपारी केली. सायंकाळी गणपतिमंदिराच्या समोरील पटांगणात व्याख्यान झाले. कमानी झेंडे माळा वगैरेनी मैदान शृंगारलेले होते. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब बापट यांची योजना झाल्यावर सोनेरी शाईने लिहिलेले मानपत्र वाचून दाखविण्यात आले. यवतमाळहून कारंजाच्या मार्गाने टिळक अकोल्याकडे गेले. वाटेत लाड- खेड बोरी दारव्हा वगैरे ठिकाणी सत्कार झाला. दारव्हेकरानी गाडी थांबण्याच्या वेळेतच मानपत्राचा समारंभ उरकून घेतला. कारंजाच्या स्टेशनावर हजारो लोक जमले होते. घुडे व दहिहंडेकर वगैरे पुढा-यानी समारंभाकरिता फारच मेहनत घेतली. आणि हा सर्व समारंभ अवघ्या ५-१० मिनिटांच्या मुक्कामाकरिता. रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म हा काही व्याख्यानाचा प्लॅटफॉर्म नव्हे. तरीपण त्या नात्याने त्याचा उपयोग करणे टिळकाना भाग पडले. पण व्याख्यानात आगगाडीच्या उपमा टिळकाना सहजच सुचल्या. ते म्हणाले " मुंबईचे तिकिट काढले म्हणजे ज्याप्रमाणे मधल्या सर्व स्टेशनांचे तिकिट काढल्यासारखेच होते त्याप्रमाणे स्वरा- ज्याचे तिकिट काढले म्हणजे दरम्यानच्या सर्व राजकीय मागण्यांची स्टेशने गाटल्याचे श्रेय येते.” नंतर विलेगाव व किनखेड यावरून टिळक सायंकाळी मूर्तिजापूर येथे आले. येथे मंडळीनी पालखीची तयारी ठेवली होती. पण टिळकानी ती गोष्ट मना केल्यामुळे इतर ठिकाणाप्रमाणे मिरवणूक निघाली. स्वराज्याची मागणी योग्य का हे व्याख्यानात सांगताना टिळक म्हणाले " आजवर खिडक्यातून