पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ लखनौ कॉंग्रेसनंतरचा दौरा जाण्याचा प्रसंग त्याचे आधी टिळकानी टाळला होता. पण मोतीबाबू जेव्हा लखनौस आले नाहीत असे पाहिले तेव्हा टिळकानी कलकत्त्यास जाण्याचा निश्चय केला. कलकत्यास टिळकांचा मुक्काम मोतोत्रातूंच्या घरीच होता. टिळक दिसताच मोतीबाचूनी कडकडून कसे आलिंगन दिले असेल याची परिचित लोकाना कल्पना येईल. सहा सात वर्षांच्या गोष्टी त्या बोलता बोलून संपणाऱ्या नव्हत्या. पण टिळकाना या प्रसंगी कलकत्यास फार दिवस राहता आले नाही. तारिख ५ रोजी कलकत्ता येथील महाराष्ट्रक्कवाची पानसुपारी घेऊन ते नागपूरकडे परत निघाले. आणि स्टेशनवर जमलेल्या मंडळीना मी पुन्हा येथे येईन असे आश्वासन देऊन टिळकाना आपली सुटका करून घ्यावी लागली. वाटेत एक दोन स्टेशन- वर सत्कारसमारंभ मोठा झाला. तारीख ६ रोजी दुपारी ते नागपूरास पोचले. मोटारी व घोड्याच्या गाड्या तयार होत्या. मिरवणूक विसापूरीतून इतवारीच्या वाटेने — वरून नारायणराव वैद्य वकील व स्वराज्यसंघ शाखेचे चिटणीस यांच्या घरापर्यंत आल्यावर थांबलो. दोन प्रहरचे स्नान भोजन तेथेच झाल्यावर संध्या- काळचा मुक्काम श्रीगोपाळरावसाहेब बुटी यांच्या वाड्यात झाला. पुढे दोन दिवस नागपूर शहर सिताबर्डी व संतारी या तिन्ही ठिकाणी अनेक खाजगी गृहस्थांच्या घरी व सार्वजनिक संस्थातर्फे पानसुपाऱ्या झाल्या. त्यापैकी महार मंडळी कोष्टी मंडळी, सोन्या चांदीचे व्यापारी वगैरेच्या पानसुपाऱ्या विशेष स्मरणीय होत्या. रविवारी सायंकाळी चिटणीस पार्कमध्ये जाहीर सभा झाली. सभेला सर बिपिन कृष्ण बोस डॉ. गौर रा. ब. पंडित नामदार दिक्षीत वगैरे नेमस्त व स्वतंत्र पक्षाची मंडळीहि आली होती. मजूर गिरणीवाले यांची तर खूपच गर्दी लोटली होती. अध्यक्षस्थानी डॉ. गौर यांची योजना झाल्यावर कवि ताम्हणकर यानी स्वतः केलेली काही पदे म्हणून दाखविली. टिळकानी आपल्या भाषणात सांगि- तले की “दगडाला देवपण देणे यात पुजाऱ्याची उदार भावना असते. पण दग- डाला काही एक मर्यादेपर्यंत देव म्हणावे लागते. ' यान्ति देवत्रता देवान्' हे "दगडी देवाला उद्देशून म्हटलेले नाही. अर्थात् स्वतःच दगड बनावयाचे नसेल तर मुख्य कार्यावर दृष्टि ठेवा. आज दहा वर्षात नागपूरमध्ये फारच फरक पडला आहे. पूर्वी एकी नव्हती ती आज उदित झाली आहे. हिंदुमुसलमान एकमुखाने स्वराज्याची मागणी करितात हे पाहून अँग्लो इंडिअन वर्तमानपत्रांचे धाबे दणा- णले आहे. लॉर्ड सिडनहॅम सारख्यानी पुढे येऊन स्वकीयाना स्पष्ट इशाराहि दिला की राणीचा जाहीरनामा फुकट आहे. बादशाही आश्वासने फोल आहेत. दिले एवढे पुष्कळ झाले. आता आणखी मागू नका असे सरकारने एकदम हिंदी लोकाना सांगून टाकावे. पण उलट तुम्हालाहि अशी चळवळ करण्याला तयार झाले पाहिजे, पण चळवळ म्हणजे काही व्यापार नाही किंवा पुराणपठण नाही. त्याकरिता कष्ट करण्याला तयार झाले पाहिजे. परमेश्वर हा प्रयत्नान्ती असतो वाचान्ती नसतो. " दुसरे दिवशी मोरोपंत अभ्यंकर यांचे घरी टिळकाना थाटाची