पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग ३ पैकी ते एक अत्यंत सन्माननीय असे पुढारी होते. प्रारंभी टिळकाना दिलेले संस्कृत भाषेतील मानपत्र वाचून दाखवून अर्पण करण्यात आले. नंतर टिळकानी इंग्रजांत भाषण केले. ही भाषा न समजणारे हजारो लोक श्रोतृवृंदात होते. पण स्वतः टिळकच बोलत आहेत व त्यांचाच आवाज आपण ऐकत आहो एवढ्या समा- धानांत गर्क होऊन ते तासभर अगदी निमूटपणे बसले होते. टिळक आपल्या भाष- णात म्हणाले " राष्ट्रीय सभेच्या ३० वर्षांच्या अनुभवाने आपण स्वराज्य माग- ण्याला शिकलो. ही मागणी मनाने व अनुभवाने श्रेष्ठ अशा पुरुषानी निश्चित केली आहे. हिंदी लोक स्वराज्याला पात्र नाहीत असे आक्षेप घेतात. पण ते स्वराज्याची मागणी करण्याला पात्र आहेत ही गोष्ट येथील प्रचंड जनसमूहा- बरूनच सिद्ध होत नाही काय ? हिंदु समाजाला शास्त्रातील चातुर्वर्ण्य मान्य आहे पण तो अनुवंशीक नाही. गुण व कर्म यांच्या योगानेच ते सिद्ध होतात. पण इंग्रजी राज्यामुळे हे चातुर्वण्यहि नष्ट झाले. कारण देशात क्षत्रिय कर्मच शिल्लक उरले नाही. क्षत्रिय कर्माप्रमाणे वैश्यकर्महि राज्यकर्त्यानी आपणाकडेच घेतले आहे. ब्राह्मणानी सुद्धा बुद्धीचा अभिमान टाकला पाहिजे. कारण वरिष्ठ अधि- काऱ्यांच्या जागेवर परदेशी लोकच सरकार आणते. अशा रीतीने हिंदुस्थानातील मनुष्ये शिल्लक राहिलो. पण गुणकर्माचा लोप सरकारमुळे झाला. स्वराज्याची मागणीहि गुणकर्मविशिष्ट चातुर्वर्ण्याच्या परिस्थितीपैकीच एक मागणी होय. आम्हाला साम्राज्यात मुले म्हणून राहता आले तरच आम्हाला साम्राज्य पाहिजे. आम्हाला साम्राज्याचे नोकर भारवाहक असे राहावयाचे नाही. मेंढ्याच्या कळ- पात वाढलेल्या वाघाच्या पिल्लाला पाण्यात प्रतिबिंब दिसताच आपल्या स्वरूपाची ओळख पटली. हिंदी लोकानाहि वसाहतीचे साम्राज्य पाहून आपले खरे स्वरूप कळून येऊ लागले आहे. जपानी लोकहि आशियाखंडात राहणारेच होत. त्यांना स्वराज्य असावे आणि आम्हाला का नसावे ? शेवटी ज्या लोकाना इतर काही प्रयत्न करिता येत नसेल त्यानी निदान स्वराज्यप्राप्तीकरिता ईश्वराजवळ प्रार्थना करीत जावे " असा उपदेश करून टिळकानी आपले भाषण संपविले. तारिख २ रोजी कानपुराहून बाकीची मंडळी परत दक्षिणेत आली. पण टिळक दादासाहेब खापर्डे वासुदेवराव जोशी एवढेच कलकत्त्याकडे निघून गेले. कलकत्त्यास जाण्याचे कारण अमृत बझारपत्रिकेचे संपादक मोतीलाल घोष यांचे निमंत्रण होय. मोतीलाल बाबू अतिशय वृद्ध झालेले असून त्याना लखनौ येथील राष्ट्रीय समेस येता आले नाही. टिळक सुटून आल्यानंतर मोतीत्राबूनी लिहि- लेल्या प्रत्येक पत्रात " मी आता वृद्ध झालो. मरणाचे दारी बसलो आहे. तुमची आमची यापुढे भेट होणे कठीण दिसते " या मजकुराचे पालुपद असावयाचेच. पण टिळक थट्टेने म्हणत " हा म्हातारा आज अनेक वर्षे असेच म्हणत आला आहे. तो इतक्यात खचित मरत नाही. त्याची प्रकृति खारकेसारखी आहे " लखनौ येथे मोतीबाबूंची गाठ सहजासहजी पडेल असे म्हणून कलकत्त्यास