पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ३ लखनौ काँग्रेसनंतरचा दौरा भाग ३ रा [ १९१७ ते १९१८ ] ( १ ) लखनौ कॉंग्रेसनंतरचा दौरा होमरूल स्पेशल लखनौपर्यंत जावयाची होती. म्हणून टिळकाना जाताना कानपुरास मुक्काम करिता आला नाही तो त्याना येताना करावा लागला. तारिख १ जानेवारी रोजी लखनौहून निघण्याचा व कानपुरास मुक्काम करण्याचा बेत नक्की पण अवचित ठरला. कानपूरची मंडळी टिळकाना घेऊन जाण्याकरिता छेदिलालच्या धर्मशाळेत धरणेच घेऊन बसलेली होती. आणि होता होता बेत एकदाचा ठरला. तो टरताच या मंडळीनी कानपूरला तारा केल्या. पहिल्या तारा पोचून त्यामागून टिळक पोचण्यास अवघा २-३ तासांचा अवकाश होता. पण तेवढ्यातल्या तेवढ्यात कानपूरच्या लोकानी रस्ते व बाजार शृंगारून टाकला. एका स्वयंसेवकाने गळ्यात ताशा अडकविला व सर्व शहरभर तो तोंडाने दौंडी पिटीत धावत गेला. टिळक कानपूर स्टेशनवर सकाळी ११ वाजता पोचले. अर्थात स्टेशनवर खूपच गर्दी झाली होती व शेतीप्रमाणे गाडीचे घोडे सोडून मोठी मिरवणूक निघाली. वाटेत आर्त्या धुपार्त्या पानसुपाऱ्या होतच होत्या. मिर- वणूकीचे विसर्जन रेल बाजारातील शेट संतोषचंद यांचे बंगल्यावर झाले. कारण तेथेच टिळकांच्या मुक्कामाची जागा ठरलेली होती. सायंकाळी ५॥ वाजता परेड ग्राऊंडवर उघड्या जागी व्याख्यानाची योजना केली होती. मध्यभागी एक मोठे व्यासपीठ उभारले होते. टिळकांच्या बरोबरची काही मंडळी दादासाहेब करंदी- कर नामदार बेळवी वगैरे टिळकांच्या आधी सभेला गेली. तो चमत्कार असा झाला की दादासाहेब करंदीकर यांच्या डोक्यावरचे दक्षिणी पागोटे पाहून हेच टिळक आले असे समजून त्यानी करंदीकरांच्या पाया पडण्याला सुरवात केली. दादासाहेव तोंडाने व हाताने 'अहो मी टिळक नव्हे ' असे सांगण्याची पराकाष्ठा करीत होते. पण त्या गर्दीत त्यांचे कोण ऐकतो ? आणि पाठोपाठ जेव्हा टिळक आले व त्यांच्याबरोबर कानपूरची पुढारी मंडळी आली तेव्हाच दादासाहेब करंदीकरांच्या वरचा टिळक असल्याचा मिथ्या आरोप निघून गेला व पाया पडून घेण्याची त्यांची दगदग बाचली. त्यावेळी ना. बेळवी त्याना हळूच म्हणाले " पहा या उत्तर हिंदुस्थानात पागोटे घालण्याचा अधिकार फक्त टिळकाना दिला आहे. त्या अधिकाराचे तुम्ही अतिक्रमण केलेत म्हणून ही तुम्हाला सन्मानाची शिक्षा सोसावी लागली. यापुढे तरी सावधगिरी ठेवा. " टिळक व दादासाहेब खापर्डे समेत आल्यावर रायबहादूर विश्वभरनाथ यांची अध्यक्षाचे जागी योजना झालो. हे गृहस्थ बरेच वृद्ध असून वायव्य प्रांता-