पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ लो० टिळकांचे चरित्र (१०) टी. आर. कृष्णाचार्य यांचे टिळकाना पत्र मद्रास २० सप्टेंबर १९१६ भाग २ माझे पूर्वज पुष्कळ काळापूर्वी पुणे प्रांताकडे होते. त्यांचे नांव टोण- पेकर. भोसले राजवंशावरोवर ते तंजावरास आले. त्यावेळेपासून इकडेच राहतात. त्या वंशातला मी मध्वमतानुयायी ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण आहे. माझ्या गावाहून कुंभकोणास आलो तेथे इंग्रजी संस्कृत शिकलो. मग वेदमंथसंग्रह केला. इतर मतांच्या ग्रंथाप्रमाणे माध्ववेदांतग्रंथ सुलभ करावे अशी इच्छा. त्याप्रमाणे अनेक वेदग्रंथ छापले. महाभारताचे पाठ इकडचे तिकडचे पाहून संशोधून छापले. अनेक व्याख्यानसहित रामायण छापले. महाभारताची अनुक्रमणिका मोठ्या श्रमाने तयार करून छापली. अशा रीतीने सर्व पैसा पुस्तकात गुंतून गेला. कोणा- ला जुगारीचा नाद तसा मला ग्रंथप्रसिद्धीचा ! ( इतका मजकूर संस्कृतात लिहून पुढे मराठीत लिहितात ) आताच एक भागवतमूलक पुस्तक एक छापिले. यापुस्तकामध्ये श्रीधर स्वामी यांचे व्याख्यानाप्रमाणे मूलपाठ धरिले आहे. मतत्रयानुसार इंग्रजी तर्जमा करून छापास आरंभ केला आहे. आजे रोजी हे दोने पुस्तक आपल पाहाणेस पाठविलो आहे. माझे पुस्तक सगळे एग सेट्टास सुमार दोनशे चाळीस रुपये होत आहेत. त्यापैकी शंभर तरी सेट आता कोणी खरेदी करून उपकार न कर- तील तर माझा एवढा मोठा धंदा व्यर्थ होणेचा संभव आहे. ( ११ ) मोतिलाल घोस यांचे टिळकाना पक्ष कलकत्ता ४ डिसेंबर १९१६ या तुमच्या राष्ट्रीय सभेच्या भांडणात मला म्हातान्याला पडून काय करावयाचे ? मो त्यात पडतो तो केवळ तुमच्याकरिता कॉंग्रेस तुम्हाला बाहेर ठेवील तर मला तिच्याशी काहीच कर्तव्य नाही. तुम्हा सर्व लोकाना रा. सभेला येथून प्रतिनिधी म्हणून आम्ही निवडू शकतो. पण तुम्ही म्हणता को ते ठीक दिसत नाही. हे तुमचे म्हणणे बरोबर आहे असे मलाहि वाटते. तुमच्या सूचना व घटनेच्या १८ व्या कलमाचा तुम्ही केलेला अर्थ मी भूपेंद्रवाचूना दाखवितो. सुरेंद्र- बाबूशी बोलण्यात मात्र अर्थ नाही. ते सर्वस्वी मेधा व गोखले यांच्या मताचे आहेत. बेझंटवाईना मी काल पत्र लिहिले. ते त्या मद्रासहून पुण्यास निवण्यापूर्वी पोचावे. यंदा पुरतो प्रतिनिधींची निवडणूक जुन्या पद्धतीने मान्य करावयाची झाल्यास ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीला अधिकार आहे असे तुम्ही लिहिले. ते व तुमचा मसुदा मो बाईकडे पाठविला आहे. मेधा व वाच्छा याना संयुक्त राष्ट्रीय सभा मुळीच नको. गोखल्याना मनातून हवी पण ते त्या दोघाना भितात तेव्हा सटवाईनी करूनच काही झाले तर होईल. सर सुब्रहाण्य अय्यर थोडे वळलेले दिसतात. बाईशी काय वाटाघाट पुण्यास होईल ते कळवा. त्यानंतर कलकत्त्यास येण्याचा त्यांचा विचार दिसतो. तसे झाले तर उत्तमच.