पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ १९१६ सालामधील निवडक पत्रे ७३ (७) चौकर यांचे केळकराना पत्र अहमदनगर ता. २३ मे १९१६ परवा जिल्हा परिषदेच्या स्वागतमंडळाची सभा भरली त्यात आप- णाला सर्वानुमते अध्यक्ष निवडले हे कळविण्यास आनंद वाटतो. त्याबरोबरच लोकसमाजाच्या विनंतीवरून टिळक याना सन्मान्य पाहुणे म्हणून निमंत्रण कर- ण्याचाहि सर्वानुमते ठराव झाला. ते आमंत्रण रीतीप्रमाणे जाईलच. पण आपणास अगत्याची विनंति की टिळकाना नगरास आपणाबरोबर आपण आणलेच पाहिजे व आणतो असे तावडतोब उत्तरी लिहिले पाहिजे. ते आल्याने मोठेच कार्य होणार आहे. बाळासाहेब देशपांडे यांचे मृत्यूने येथील सार्वजनिक चळवळीचे काम अगदी बंद पडले आहे. त्याला पुनः जीवन मिळून ते फोफावणार आहे. नाहीतर अजिबात नष्ट होण्याचा प्रसंग गुदरणार आहे. तरी टिळकाना वरील गोष्ट ताबडतोब कळवून ते सिंहगडास असले तर तेथून त्यांचे अनुमोदन आणवून मला कळवावे. जास्त काय लिहू ? मी सर्वाना कबूल केले आहे की टिळकाना मी येथे घेऊन येईन. तेव्हा ती मंडळी माझे भरवशावर बसली आहेत. (८) मिसेस बेझंट यांचे केळकराना पत्र मद्रास १८ जून १९१६ वि. वि. आपल्या दोनहि संघांचे उद्देश एकच आहेत आणि आपण उभयताहि सहकारितेने काम करणार आहो. तेव्हा ज्याची जशी आवड असेल तसे त्याने ह्या अगर त्या संघाचे काम करावे. एकाच गृहस्थाने जर दोनहि संघांचे काम केले तर त्यावरून त्यांचा अभिन्नभाव अधिकच स्पष्ट होईल. ( ९ ) बॅप्टिस्टा यांचे गोखले यास पत्र मुंबई ८ जुलै १९१६ माझ्यामते आपल्या संघाच्या विद्यमाने होमरूलवर व्याख्याने करवावी. केळकरांचे लेक्चर १३ ऑगस्टला होईल तर मी अध्यक्ष होण्याला येऊ शकेन. या व्याख्यानात कोणीहि राजद्रोहात्मक बोलणार नाहीच. पण कोण काय बोल- णार याच्यावर केळकरानी थोडी नजर ठेवलेली बरी. सरकार होमरूलच्या चळ- वळीतून राजद्रोह सिद्ध करू पाहणार की काय असा प्रश्न आहे. त्यातून राजद्रोह निघाला तर अर्थातच चळवळ थांबेल. पण भाषणांचा बरोबर बिनचूक रिपोर्ट सर- काराकडे जावा हे बरे याकरिता कलेक्टर किंवा सेक्रेटरी याना लिहून तुम्ही आपले विश्वासू लघुलेखक पाठवाल तर बरे अशी आपणच त्याना विनंती का करू नये ? तसे झाले म्हणजे सरकारचा विचार काय आहे हे एकदा कळेल तरी.