पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ लो० टिळकांचे चरित्र (४) नटेशराव द्रविड यांचे केळकरास पत्र भाग २ नागपूर ३ मे १९१६ सुरत येथील तंटा व फाटाफूट यानंतर आज मी हे पहिलेच पत्र तुम्हाला लिहित आहे. या आपसातील कलहाविषयी तुम्हा आम्हाला किती वाईट वाटते हे ईश्वरालाच माहीत. बेळगावास तुम्ही मंडळीनी जो एकीचा ठराव केला त्या- बद्दल तुमचे व त्याहूनहि आमचे अभिनंदन करावेसे वाटते. हा सलोखा ठेव- ण्याचे काम करण्याला तुम्हाला आहे याहून अधिक बळ मिळावे अशी माझी प्रार्थना आहे. गोखले मरण पावण्यापूर्वीच हे घडून येते तर अधिक चांगले झाले असते, पण उशीरा झाले तरी ते हवेच होते. आता पूर्वीप्रमाणे दोन्ही पक्षानी मिळून काम करावे अशी मला फार उमेद आहे. ती व्यर्थ ठरेल काय ? कोणी कडून तरी सर्व प्रामाणिक मतांची माणसे एकत्र जमावीत व त्यानी होईल ते कार्य करावे. आग लागो या पक्षभेदाला ! मी पुण्यास लवकरच येईन व तुमची गाठ घेईन. (५) ग. कृ चितळे यांचे केळकरास पत्र तां. ६ मे १९१६ महाराष्ट्रातील उभय पक्षात सलोखा व्हावयास पाहिजे होता तो घडवून आणण्यात तुम्ही मदत केली याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजेत. हे घडून येण्याला तुम्हाला किती प्रयत्न पडले असतील याची मला कल्पना आहे. या पुढील खटपट आपण लौकरच केली पाहिजे म्हणजे जिल्हासभा व प्रांतिक परि- पदा भरतील त्या राष्ट्रीय सभेच्या नियमान्वये भरविल्या जाव्या. कारण तुम्ही आम्ही सर्वानीच हे नियम आता मान्य केले आहेत. तरी आपला विचार कळ- वावा. जमत असेल तर येथे उभयपक्षांच्या पुढाऱ्याना बोलावण्याचा विचार आहे. " (६) ग. कृ. चितळे यांचे केळकराना पत्र अहमदनगर ता. २० मे १९१६ काल स्वागतमंडळाची सभा झाली व तिने सर्वानुमते अध्यक्षाच्या जागीं तुमची निवडणूक केली हे कळविण्यास मला आनंद वाटतो. हे जोखमीचे काम तुम्ही नाही म्हणणार नाही अशी मला आशा आहे. तुम्हाला अलिकडे पुष्कळ श्रम झाले आहेत. तरीपण तुमची विश्रांति घेण्याची वेळ अजून पुढेच आहे. चौकर वकील यानी आमच्या वळवंतराव टिळकाना नगरास येण्याचे आमंत्रण दिले आहे व ते स्वीकारून तुम्ही दोघे मिळून येणार असे घडवून आणाल तर मो तुमचे फार आभार मानीन. जिल्हा परिषदेत विषय मोजके असावेत प्रमाणाबाहेर असू नयेत ही तुमची सूचना मला मान्य आहे.