पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लो० टिळकांचे चरित्र भाग १ - कोणाला अभिप्राय विचारले व कोणी ते प्रतिकूल दिले हे सांगणे अर्थात कठीण आहे. ते बाहेर पक्के कोणाला कळणार ? यासंबंधाने काही थोडा पुरावा आमच्या- जवळ आहे. पण आता नाव गाव सांगून उगाच पोटदुखी उत्पन्न करण्याचे कारण नाही. त्या नसत्या वादाविणे आता काही अडलेहि नाही म्हणून तो विषय आम्ही सोडून देतो. पण इतकी गोष्ट निश्चित आहे की लॉर्ड सिडेनहॅम यांच्या आग्रहामुळे टिळकांची सुटका तेव्हा झाली नाही. राजकीय परिस्थितीवरून सुटकेची अनुमाने व्यवहारचतुर म्हणविणाऱ्या लोकानी जशी केली तशीच टिळकांच्या पत्रिकेवरून ग्रहगणित करून काही ज्योतिषानीहि अनुमाने केली होती. त्याना' भविष्ये' असे म्हणण्याची रीत आहे पण तीहि अनुमानेच होत. पण यावेळी गणित चुकले म्हणा ज्योतिषाचे नियम चुकले म्हणा ही अनुमाने व भविष्ये दोन्हीहि फुकट गेली. पृथ्वी- वरच ग्रह आणि अंतरिक्षातले ग्रह दोघानीहि भविष्यवाद्याना अद्दल घडेल असा दगा दिला. पण टिळकांच्या कैदेची मुदत निश्चित होती आणि त्यावरून ठरविलेले अनुमान मात्र खरे ठरणारे होते. पण एका अर्थी तेहि चुकले. ही चूक दुतर्फी होत होती. काही लोकाना वांटे की शिक्षेची सहा वर्षे ता. २२ जुलै १९१४ रोजी पुरी होतात. म्हणून नक्की त्याच दिवशी आणून टिळकाना सोडतील. काहीना वाटे की शिक्षा वरील तारखेस झाली असली तरी टिळकाना ता. २४ जून रोजी पकडण्यात आले त्याअर्थी तो दिवस व शिक्षा झाल्याचा दिवस याच्यामधले दिवस शिक्षेच्या मुदतीतच मोजले जातील. याशिवाय गणिताचा तिसरा एक प्रकार होता तो असा की चांगल्या वर्तणुकीबद्दल कैद्याना काही नियमाप्रमाणे सूट मिळते. त्याचा फायदा टिळकाना देतील. पण हे नियम सर्वस्वी अबाधित नसतात. जेलरची शिफारस आणि सर- कारची मान्यता या दोहोवर सूट मिळण्याचे दिवस अवलंबून असतात. पण या सर्वाहून वेगळे असे अनिश्चितपणाचे आणखी एक कारण होते. ते असे की सन १८९८ मध्ये टिळकांची येरवड्याहून सुटका झाली तेव्हा त्याना सुमारे सहा महिने आधी सोडले होते. आणि मला राजद्रोहाच्या गुन्ह्याकरिता पुनः शिक्षा झाली तर उरलेली ही शिक्षेची मुदत त्यावेळी भरून देईन अशी कबूली सर- कारने टिळकांकडून घेतली होती. ती शर्त १९०८ च्या खटल्याच्या शेवटी सर- कारने कोर्टापुढे उपस्थित केली होती. हे लोकांच्या स्मरणात असल्यामुळे ते सहा महिनेहि आता भरून घेतात की काय किंवा ते जमा धरूनच सहा वर्षांची शिक्षा दिली याचा नीट खुलासा त्यावेळी झालेला नव्हता. म्हणून जुलै ता. २२ रोजी तरी टिळक सुटतील हे कोणी सांगावे असे लोकाना वाटले. टिळकांची मंडाले येथून आलेली पत्ते पूर्वी दिली आहेत त्यावरून टिळकहि स्वतः आपला अंदाज बांधीत होते आणि त्यानी शेवटच्या पत्रात ' हे माझे येथील शेवटचे पत्र ' असे स्पष्ट लिहिले होते. यावरून टिळकांना काही सुगावा लागला असावा असे मान- प्याला जागा होती. पण ही पत्रे खाजगी होती. शिवाय उगीच लोकाना आशा लावावी व कदाचित् ती फसाची हे बरे नव्हे असे समजून केसरीने या माहितीचा