पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ १९१६ सालामधील निवडक पत्रे परिशिष्ट ७१ १९१६ सालामधील निवडक पत्रे (१) डॉ मुंजे यांची केळकराना तार नागपूर ता. ३ जानेवारी १९९६ काँग्रेसचा समेट मान्य नाही. तथापि आपण ठरवाल त्याबाहेर आम्ही नाही. (२) खापर्डे यांचे टिळकाना पत्र अकोला १ एप्रिल १९१६ काल खाडिलकर येऊन त्यानी मला आपले पत्र दिले. मला मोठाच मान देण्याचे तुम्ही योजिले आहे. व तेहि अगदी अकलित. म्हणून तो स्वोकारावा की नाही याबद्दल क्षणभर मन गोंधळले, कारण माझे दोष मला माहीत आहेत. तरी पण मी येण्याचे कबूल करतो. येथील व नागपूरच्या मित्रमंडळोना तुमच्या पत्रातील विचार कळविले व तुमचे काय विचार असतील ते उघडपणे मांडण्याच्या तयारीने चला असेहि मी त्याना सांगितले. (३) बेळवी यांचे केळकराना पत्र बेळगाव २२ एप्रिल १९१६ आमची परिषदेची तयारी जोरात चालू आहे. परंतु अधिकारी वर्गाची प्रतिकूलता आहे असे पाहून प्रतिपक्षानीहि थोडी उचल केलेली दिसते. जैन लोकानो या सभेवर बहिष्कार घालावा असे ठरविण्याकरिता एका बंगल्यात सभा झाली. पण दुसरे सुज्ञ जैन सभेला गेले. त्यांचा हेतू अशा सूचनेला विरोध कर- ण्याचा होता आणि हे लोक जाऊन पाहतात तो तेथे निमंत्रण करणारापैकी दोघे व स्वतः लठ्ठे इतकीच मंडळी होती. अशा रीतीने या विरोधकांची फजीति झाली. काही लिंगायत लोकाकडूनहि असाच विरोध होणार आहे. दोन पक्षांचा समेट होणार हे तिसन्या पक्षाला मानवत नाही इतकेच. अधिकाऱ्यानी गुप्त सर्क्युलर काढल्यामुळे सरकारी नोकर भाडे घेऊनहि आपल्या जागा घरे देत नाहीत. वेळ- गावास होमरूल लींगची स्थापना होण्याचा विचार आहे पण ती आता इतक्या- तच झाली पाहिजे काय ? तथापि रेव्हिन्यू कमिशनर याना मी आश्वासनपूर्वक कळविले आहे की सर्व काम रीतसर राजनिष्ठपणे व कायदेशीरपणे होईल. कदाचित् प्रेक्षक लोक विशेष गडबड करावयाचे म्हणून त्यांची तिकिटे अगदी आयत्या वेळी काढण्याची ठरविली आहेत.