पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० लो० टिळकांचे चरित्र भाग २ खणीत आवाजाने आपल्या तोंडाने स्वराज्याची मागणी करणे हा ह्या प्रयत्नाचा प्रारंभ होय. माझ्या घरात मी कारभार करणार असे म्हणण्याला कोणालाहि भिण्याचे कारण नाही. " टिळकांच्या भाषणानंतर वेझटवाईचे अनुयायी जिवराजदास अरंडेल सी. पी. रामस्वामी अय्यर इत्यादिकानी स्वराज्यसंघाच्या कार्याची माहिती सांगितली व बन्याच उशीरा सभा समाप्त झाली. पण याशिवाय खाजगी भेटी बैठका चर्चा सभा समारंभ व्याख्याने वगैरे सुमारे चार दिवस चालू होती. टिळकांचा मुक्काम तारिख ३१ डिसेंबर पर्यंत लखनौस पडला. राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष बाबू अंत्रिका चरण मुजुमदार यांच्या पासून खाली सर्व दर्जाचे जातीचे व धर्माचे लोक टिळ- कांच्या भेटीला येऊन गेले. छेदीलालच्या धर्मशाळेपासून राष्ट्रीय सभेच्या मंडपा- पर्यंत टिळक जात येत त्यालाहि एकप्रकारे मिरवणुकीचे स्वरूप येत असे. मंडपात सभा चाललो असताना बाहेर गारठ्यात येऊन लोकांच्या भेटीकरिता टिळकाना उभे राहावे लागे. व आलेल्या लोकांची गांठ पडावी म्हणून हप्त्या हप्त्याने दर्शन देऊन देऊन त्यांची मोकळीक स्वयंसेवकाना करावी लागे. याच दिवसात हिंदु सभेची परिषद भरली होती. ह्या सभेच्या निमंत्रणावरून टिळक गेले व तेथेहि त्यानी भाषण केले. आज हिंदुसभेला जे संघटित स्वरूप आहे ते स्वरूप त्या वेळी नव्हते. शिवाय मुसलमानाना सवलती देवविल्याबद्दल हिंदुसभा टिळकांवर रागा- वलेली होती !