पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ लखनौची राष्ट्रीय सभा ६९ तीत दुसऱ्या पक्षाचे सात लोक घातले होते सगळीच आपली मंडळी भरली नव्हती. तरी या यादीची तक्रार गांधी यांच्याकडे आदल्या रात्री गेली. तेव्हा ते छेदिलालच्या धर्मशाळेत आले. तेथे त्यांचे व केळकर यांचे बराच वेळ सर्व लोकादेखत भाषण होऊन एक याद ठरली. ती गांधीना मान्य झाली. तेव्हा ते म्हणाले की ही याद मी दुसऱ्या पक्षास दाखवितो व ते कबूल असल्यास तुझा- कडे परत येऊन कळवीन. पण त्याप्रमाणे ते रात्रो किंवा दुसऱ्या दिवशी आले नाहीत यावरून ती मान्य झालो नाही असे दिसून आल्यावरून पूर्वीची आपली यादी आपण मांडावी मग होईल ते होईल असे ठरले. आदल्या रात्री गांधी म्हणाले होते को " मंडळी मला म्हणताहेत की त्रयस्थ म्हणून तुम्ही निवडणुकीच्या सभेचे अध्यक्ष व्हा.” तेव्हा केळकर म्हणाले “टिळक अध्यक्ष झाले म्हणून तरो भीति कसली ? तथापि आपण अध्यक्ष झाला तरी आमची हरकत नाही." पण सभेच्या वेळी गांधी येऊ शकले नाहीत. आणि एका बाजूने गोकुळदास पारेख यांचे नाव व दुसऱ्या बाजूने टिळक यांचे नाव सुचविण्यात आल्यावर टिळकानान्च बहुमत मिळाले. गांधी यांचे नाव कोणत्याच पक्षाने केलेल्या यादीत नव्हते पण ते आयत्या वेळी सुचविले गेले व टिळक पक्षातील मते मिळूनच ते शेवटी निवडून आले. ही निवडणूक होमरूलर लोकाना घ्यावे की वगळावे या तत्त्वावर झाली इतके सांगितले म्हणजे वादाचे बीज लक्षात येईल. लखनौ येथील सभेचे अधिवेशन संपल्यावर तारिख ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ब्रह्मविद्या मंडपात 'स्वराज्यसंघ परिषद भरली. सुमारे १००० स्वरा- ज्यवादी लोक सभेला हजर होते. अध्यक्षस्थानी बेझंटबाई होत्या. प्रारंभी त्यांचे भाषण झाल्यावर त्यांच्या सूचनेवरून टिळकानीहि भाषण केले. ते म्हणाले "लखनौ येथील सभेत मुख्य दोन गोष्टी घडल्या. स्वराज्याची मागणी निश्चित झाली ही एक व दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे हिंदुमुसलमानांची एकी होऊन उभय पक्षानी मिळून तिची मागणी निश्चित केली. पण तो गोष्ट अवश्यक होती. एखाद्या भानगडीच्या मुकदम्यात पक्षकार चांगल्या वकिलाची मदत मिळविण्याकरिता दाव्याच्या मिळ- कतीतील बराचसा भाग वकिलाला देण्याचे कबूल करितो त्याप्रमाणे स्वराज्याच्या मागणीत मुसलमान बंधु सामील व्हावे म्हणूनच त्याना ह्या विशेष सवलती दिल्या आहेत. ते बरोबर असो की चूक असो. पण त्यांच्या सहायाशिवाय स्वराज्याच्या मागणीचे गाडे चालू लागणार नाही. मुसलमानाना सवलतो जास्त मिळतील तर त्या मानाने स्वराज्यसिद्धोचो त्यांची जवाबदारी वाढेल. युद्ध तिरंगी असले म्हणजे कोणच्यातरी दोन पक्षानी एक झाल्याशिवाय तिसऱ्याचा मोड होत नाही. इंग्रजांच्या हातून सत्ता हिसकावून घ्यावयाची तर रसोखेचीच्या खेळात आमच्या- बरोबर मुसलमानानोहि हातभार लावला पाहिजे. इकडे दुसऱ्या नोकरशाही अशी राहतात तरी ते काही कमो बलवान नाहीत. एकत्र मिळाले तरी आम्हाला विशेष जोराचा प्रयत्न केला पाहिजे. टोकाला इंग्रज व म्हणून दोन पक्ष प्रत्येकाने खण-