पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८ लो० टिळकांचे चरित्र भाग २ म्हणून ' अधिकाराच्या जागा वाटेल तर हिंदूना द्या वाटेल तर मुसलमानांना द्या पण आमच्यापैकी कोणाला तरी द्या. मात्र तुम्ही यापुढे त्या आपल्या हाती ठेवून घेऊ नका' असे ब्युरॉक्रसीला सांगण्याची स्पष्ट तयारी दोघांचीहि झालेली आज दिसत आहे. राष्ट्रीय भावनेचे खरे वीज काय ते ह्यातच आहे. व हे बीज हिंदुस्था- नच्या भूमीत आता पुरते रुजले गेले ह्याविषयी सरकारासहि फारशी शंका उरेल असे आम्हाला वाटत नाही. " राष्ट्रीय सभेने ही मागणी सरकारपुढे रीतसर मांडण्याची काही व्यवस्था स्वतःची अशी केली नाही. कल्पना अशी होती की आता पुढे निरनिराळे लोक विलायतेस जाऊन तेथे या मागणीचा पुरस्कार करतील. काँग्रेसने स्वतःचे शिष्ट- मंडळ पाठवावे किंवा याच कामाकरिता चार माणसे नेमून देऊन त्यांच्या खर्चाची तजवीज करावी अशी जी सूचना पुढे आली ती घटनेत बसत नाही हे कारण लावून ती निकालात काढण्यात आली. इतर लोक आपल्या इच्छेने आपल्या खर्चाने जातील व चळवळ करतील सवरतील ही गोष्ट निराळी. हुकूमनामा कोर्टाचा पण तो बजावण्याचे काम मात्र कोर्टाचे नाही अशातला हा प्रकार झाला ! तथापि एक गोष्ट काँग्रेसने चांगली केली ती ही की सर्वसाधारणपणे आपल्या पोट- कमियाना होमरूल संघाना व देशातील अनेक राजकीय सभाना ही चळवळ करण्याचे निमंत्रण केले. हातात काँग्रेसचा जाहीरनामा दिला व ज्याला शक्य असेल त्याने तो या देशात परदेशात वाचून दाखवावा समजून सांगावा व त्याचा अंमल करण्याचा प्रयत्न करावा असा वटहुकूम सुटला होता. लखनौच्या या बरील ठरावात होमरूल संघाचा निर्देश करावा की नाही असा प्रश्न थोडासा निघालाच व कित्येकानी आढेवेढे घेतलेच. याचे थोडेसे कारण असे की बाईचा स्वराज्यसंघ जसा काँग्रेसला जोडून घेण्यात आला होता तसा टिळकांचा संघ जोडून घेण्यात आला नव्हता ही आढेवेढे घेणाऱ्यांच्या मनातली गोष्ट होती. पण देशातल्या सर्वच संस्थाना चळवळ करण्याविषयी हे आमंत्रण दिलेले असल्यामुळे टिळकांचा संघ काँग्रेसला जोडून घेतलेला नसला तरी त्याला वगळून पंक्तिप्रपंच करण्यासारखे बारकाईचे शब्द तरी कोठले आणणार ? शिवाय तेथे सर्वांच्या मनात ही जाणीव दिसत होती की गेल्या वर्षात होमरूलवाल्यानीच या कामी पुष्कळ चळवळ केलेली आहे. असो. लखनौ येथे होऊ घातलेली एकी पाहून लगेच लॉर्ड सिडन- हॅम यानी तिकडील पत्रातून इशारा दिला की 'हिंदुस्थानात धोका आहे सांभाळा !' जाता जाता लखनौ येथील विषयनियामक मंडळ निवडण्याचे वेळी जी एक लहानशी गोष्ट घडली तिचा उल्लेख करितो. ही निवडणूक महत्त्वाची असते हे सर्वांना ठाऊकच आहे. हे जाणून निवडणुकीच्या सभेत टिळकपक्षाच्या लोकानी चलाखी दाखवून प्रथम जाऊन पुढच्या सोईच्या जागा घेतल्या. यामुळे इतराना मागे गर्दीत उभे राहावे लागले. प्रत्येक पक्षाने आपापली एक याद करून आणली होती. त्याप्रमाणे या मंडळींनी मुंबई इलाख्याकरिता पंधरा नावे सुचविली. पण