पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ लखनौची राष्ट्रीय सभा ६७ त्याचा कोणताही प्रतिपक्षी काढून टाकण्यास समर्थ होणार नाही. सरकार आज- पर्यंत हिंदी लोकातील दुफळीमुळे स्वराज्यवाद्याची कीव करीत असे पण आता ह्या कामी निराश्रित म्हणून स्वतः सरकारचीच कीव आम्हाला यापुढे करावी लागणार ! राष्ट्रीय सभेच्या जन्मापासून हिंदुमुसलमानामध्ये फूट पडण्यास सुरुवात झाली व गेल्या दहा वर्षांत खुद हिंदू लोकामध्येहि त्यातल्या त्यात अधिक नेमस्त असणाऱ्या लोकास हाती धरून फूट पाडण्याचा प्रयत्न अनेक व्यक्तांनी बरेच दिवसपर्यंत यशस्वी रीतीने केला. पण काळच उलटला म्हणजे उलट्याचे सुलट होण्यास वेळ लागत नाही व तीच गोष्ट हिंदु मुसलमान आणि नेमस्त - जहाल हे दोन मोठे पक्षभेद अवघ्या ४/५ वर्षात नाहीसे होण्याच्या कामीहि दिसून आली. हिंदु-मुस- लमानांचे वैर एका अर्थाने अनेक शतकांचे असे म्हणण्यास हरकत नाही आणि मत्राळ- जहाल हा भेद जरी अगदी अलीकडचा तरी पक्षभेदाच्या दृष्टीने पाहता 'हिंदुमुसलमानांच्या वैराइतकाच किंबहुना अधिक घातक होऊन राहिला होता हे काही खोटे नाही. पण हे पक्षभेद उगवत्या राष्ट्रीय बुद्धीच्या तेजामुळे वितळून गेले. शेवटल्या मुसलमान नबाबाच्या राजधानीत मुसलमान व हिंदु विद्वान आणि राइस एकाच सभापीठावर बसून त्यानी प्रत्यक्ष स्वराज्याची ताबडतोब मागणी केली त्याअर्थी ब्युराक्रसोची सद्दो आता संपली असे तिने खास समजावे हा इशारा आम्ही बेलाशक देऊ शकतो. राष्ट्रात दुफळी माजवू इच्छिणान्या अँग्लोइंडियन शकुनीना अशिक्षित किंवा अस्पृश्यवर्गाकडे धाव घेण्याशिवाय आता गत्यंतर उरले नाही पण हे त्यांचे आधारस्थानही त्याना फार दिवस लाभण्याचा संभव नाही. कारण सर्वच लोकाना आता हे निश्चित कळू लागले आहे की हिंदी लोकापैकी कोणत्याहि वर्गाच्या हाती सत्ता आल्यास ती एका दृष्टीने आपल्याच हाती आल्यासारखी आहे. अशी बुद्धी खरोखरच उदित झाली असती तर कायदे- कौन्सिल वगैरेतून आपल्या प्रतिनिधींचे प्रमाण काय राहावे याविषयी खाजगी करारमदार करून घेऊन का होईना पण स्वराज्याचे अधिकार एकंदरीने हिंदी लोकांच्या हाती यावे, ब्युरॉक्रसीच्या हाती यापुढे ते राहू नयेत, अशा मागणीस मुसलमान लोक हिंदी लोकाना कधीहि मिलाकी झाले नसते. अमेरिकन प्रेसिडेंट आब्राहाम लिंकन ह्याचे एक असे वचन प्रसिद्ध आहे की ' या जगात सर्व माण- साना काही थोडा वेळ किंवा काही थोड्या माणसाना सर्व वेळ फसविता येणे शक्य आहे. पण जगात असा कोणीहि बिलंदर भोंदू असू शकतच नाही की जो सर्व लोकाना सर्व काळ फसवीत राहील. ' ब्युरॉक्रसी ही भोंदू आहे असे आम्ही मुळीच म्हणत नाही. ती आपले कर्तव्य तेच करीत आहे. तरी स्वराज्याचे अधि- कार देण्याच्या बाबतीत त्यांच्या हातून न कळत का होईना पण एकाची सबब दुसन्यास सांगून दोघानाहि अधिकारविरहित ठेवण्याचे प्रयत्न आजवर होत होते. पण एकच सबब सांगून तात्पुरते निरुत्तर केलेल्या दोघांची गाठ केव्हा तरी पडून खुलासा झाला म्हणजे खरा प्रकार उघडकीस आल्याशिवाय कसा रहाणार १