पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ लो० टिळकांचे चरित्र भांग २ तो त्याला पात्र आहे. तथापि आम्ही आज मागत आदो इतक्या तरी सुधारणा राज्यकारभारात झाल्या पाहिजेत. म्हणजे आम्ही त्या स्वराज्याचा पहिला हप्ता म्हणून स्वीकारण्यास तयार आहो." म्हणून लखनौच्या काँग्रेसने स्वराज्याचे निशाण रोवले असे सर्वानी म्हटले. यासंबंधाने केसरीने लिहिले ते असे:- "शुक्रवार ता. २९ डिसेंबर १९१६ हा दिवस हिंदी राष्ट्राच्या इतिहासात- निदान ब्रिटिश रियासतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरानी लिहून ठेवण्यासारखा उग- वाह्यविपयी शंका नाही. कारण त्या दिवशी आम्ही वर म्हटल्याप्रमाणे हिंदी स्वराज्याचे निशाण लखनौ येथे गोमती नदीच्या तीरावर रोवले गेले ! जुन्या काळचे ऐतिहासिक प्रसंग आठवून व केवळ कल्पनेने त्यांचे भडक रंगाचे चित्र बनवून अद्भुत रस आळवीत बसणारे कवी पुष्कळ भेटतात किंवा भविष्यवादाची चटक लागलेलो असल्यामुळे पुढे कधी काळी येणाऱ्या सुवर्णयुगाचाच अद्भुतपणा ज्याना पटू शकतो असेहि लोक आढळून येतात. पण वर्तमानकाळी किंबहुना प्रत्यक्ष डोळ्यापुढे घडणाऱ्या गोष्टींचा अद्भुतपणा पटून त्याचे स्वारस्य घेण्याला जी सहृदयता लागते ती काही विशेष व दुर्मिळच होय. असली लोकोत्तर र सि- कता ज्या थोड्या लोकाना ईश्वराने दिली असेल त्यानाच लखनौ येथील राष्ट्रीय सभेच्या मंडपात स्वराज्याच्या मागणीविषयी जो ठराव गेल्या शुक्रवारी मंजूर कर- ण्यात आला त्याचे महत्त्व कळून येईल. चालू राजकारण डोळ्याने प्रत्यक्ष दिसते म्हणून ते काही रुक्ष किंवा कमी अद्भुत खास नव्हे. आणि इतिहास झाला तरी यातील कोणताहि अद्भुत प्रसंग हा कोणत्या ना कोणत्या तरी वेळी 'चालू राज- कारणच ' होता की नाही ? शुक्रवारचा ठराव म्हणजे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय आ- कांक्षेने केलेला मुकुटधारणविधीच होय ! या समारंभाला तिची सर्व प्रजा आपा- पला नजराणा घेऊन हजर होती. हिंदुस्थानातील असा एकहि वर्ग नसेल की ज्याचे प्रतिनिधी या समारंभास आले नव्हते. जातिभेद मतवैचित्र्य व्यक्तिद्वेष वगैरे राष्ट्रीय कार्योच्छेदक पिशाचानीहि गोमतीच्या प्रवाहात गती घेतली व नवीन शुभ देह धारण करून मंगळ आशीर्वादच दिला. ब्रिटिश रियासतीचा इतिहासकार झाला तरी तो उद्या याहून दुसरे काय म्हणणार ? आपले राजकीय हृगत हुडकून काढण्याला व त्याला समर्पक अशा शब्दांचे रूप देण्याला राष्ट्राला पाच पन्नास वर्षे लागली खरी. पण ते हृद्रत त्याचे त्याला आता खरे कळून आले आणि गेल्या शुक्रवारी सर्व राष्ट्राने एकमुखाने त्याचा एवढा मोठा उच्चार केला की त्याचा आवाज सर्व जगभर पसरला. अर्थात् त्याचा विसर त्याला स्वतःला ह्यापुढे पडणे शक्यच नाही व त्याच्या हातून यापुढे जो जो म्हणून उद्योग होणार तो तो ते हृद्रत सफळ होण्याकरिताच होइल यात शंका नाही. "एखादे काठोकापडाचे निशाण किंवा जरीपटका प्रतिपक्षी प्रबळ झाला असता त्याला काढून टाकता येतो किंवा हस्तगत करून पायाखाली तुडविता येतो. पण हिंदी राष्ट्राने स्वराज्याची मागणी करून रोवलेले हे अपूर्व निशाण आता