पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ लखनौची राष्ट्रीय सभा ६५ दिशा लागल्यामुळे जुने भेद लोपून जावे निदान नवे भेद उत्पन्न होईपर्यंत तरी एकी राहावी ही गोष्ट सर्वसंमत झाली. म्हणूनच लखनौ येथे सर्व पक्षांचे लोक- पुनः एकत्र जमा झाले. हिंदी राजकारणाच्या खेतीत जहालमवाळांच्या भांडणाच्या तीक्ष्ण नांगराने जमीन पूर्वीच उकरली आणि मध्ये चर पाडून माती दोबाजूलाः गेली. पण महायुद्धाने उत्पन्न झालेल्या आशेच्या कुळवाने दोहो अंगची माती चरात टाकून फिरून ते बुजविले. स्वागताध्यक्ष जगत् नारायण यानी आपल्या भाषणात बाहेर राहिलेले जहाल व मुसलमान हे दोघेहि काँग्रेसमध्ये आल्याबद्दल अभिनंदन केले. बाबू अंबिकाचरण मुजुमदार यानी अध्यक्ष म्हणून भाषण करताना म्हटले की '१९०७ साली सुरत येथे फ्रेंचांच्या प्राचीन बागेत ज्या कॉंग्रेसची दुफळी झाली ती आज नऊ वर्षांनी लखनौच्या केसरबागेत पुनः जोडली गेली ही आनंदाची गोष्ट होय. १- पुढे आणखी एक मार्मिक वाक्य ते बोलले ते असे. " यापुढे वृद्धानी तरुणाना झिडकारू नये आणि तरुणानी वृद्धांचा उपमर्द करू नये.. दूरदृष्टि पोक्त विचार सावधगिरी हे गुण खरे पण त्यांचा अतिरेक झाला म्हणजे त्यांचे पर्यवसान भागू- बाईपणात व नैतिक अधःपातात होते. उलटपक्षी उत्साह जोम हे गुण प्रशंसनीय आहेत खरे पण उतावीळपणाच्या भरात संस्थेचा चुराडा होत असतो. म्हणून एकमेकांचे दोष काढीत न बसता, ज्या पुढाऱ्यानी आजपर्यंत विजय मिळविला. नसला तरी चिकाटीने व विश्वासघात न करिता झगडा चालू ठेवला त्यांच्या पाठो- पाठ आपण जाऊया. या दृष्टीने सुरतेच्या बखेड्यानंतर आज नऊ वर्षानी लख- नौस आमच्यामध्ये परत आलेले माझे मित्र टिळक यांचे मी आनंदाने अन्त:- करणपूर्वक स्वागत करितो. तेहि आपल्यातलेच आहेत यास्तव त्यांचा आमचा कधीहि वियोग न होवो. " सुरतेनंतर जी काँग्रेस भरली तिच्या अध्यक्षानी असे म्हटले की जे आमच्यात नाहीत ते आमचे नव्हतेच. आणि आता लखनौच्या अध्यक्षानी तेहि आपल्यातलेच आहेत असे म्हटले. हे पाहिले म्हणजे एखादी तापट आई रागावली असता मुलाला भेल्या म्हणते आणि फिरून प्रेमाने त्यालाच चिरंजीव म्हणून लिहिते या घरगुती प्रसंगाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.. प्रथम दोन दिवस विषयनियामक मंडळात ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीने केलेली व मुस्लिम लीगने केलेली अशा सुधारणांच्या योजना एकत्र घेऊन कलम- बार वाचून निष्कर्षरूप एक नवी योजना सर्वानुमते मंजूर झाली. या योजनेला पुढे बरेच दिवस " कॉंग्रेस-लीग स्कीम " या नावाने प्रसिद्धी आली. ही योजना ठरावाच्या रूपाने तिसऱ्या दिवशीच्या सभेत बाबू सुरेंद्रनाथ बानर्जी यानी मांडली. या ठरावाची प्रस्तावना विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. कारण तीत स्वरा- ज्याच्या पात्रापात्रतेच्या वादाला कायमची मूठमाती दिली आहे. या प्रस्तावनेसह ठरावाचा अर्थ असा की "आमचा देश पूर्वी स्वराज्याला पारखा नव्हता आजहि टि० उ... १२