पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ लो० टिळकांचे चरित्र भाग २ कल्पना होय. टिळक मंडालेहून तुटून जगून वाचून पुनः राष्ट्रीय सभेत आलेले दिसले हे पाहून त्या सगळ्याच समाजाला आनंद व कौतुक वाटले असले पाहिजे, सुरतेची आठवण दुःखदायक असली तरी काळाने बुजत नाही अशी आठवण कोणती असते ? शिवाय नेमस्तानाहि टिळकानी थोडेसे असे म्हणण्याला जागा करून दिलीच होतो की नाही की "सार्वजनिक सभेकडून निवडून या की आणली कोणीकडून या. पण प्रतिज्ञालेखावर शेवटी सही केलीतच की नाही? स्वातंत्र्य- यादी सुद्धा राष्ट्रीय सभेत असावेत असे म्हणता म्हणता त्याना बाहेर ठेवून साम्रा- ज्यान्तर्गत स्वराज्य पत्करून कॉंग्रेसच्या आश्रयाला अखेर आलातच ! घटनेत आता पुढे काय दुरुस्त्या कराल त्या पाहू. पण आम्ही तयार केलेले नियम मान- ल्याचे तुम्ही कबूल केलेच की नाही ? आम्ही काही कधी तुमच्या राष्ट्रीयपक्षाच्या परिपदाना आलो नाही. तुमची घटना अशी करा तशी करा म्हणून तोंडे वेगाडली नाहीत तुमच्या पुढाऱ्याकडे जाऊन पायपिटी केली नाही. यावरू- नच सत्पक्ष कोणाचा तो दिसून आला. आणि आमचा सत्पक्ष होता म्हणूनच हट नव्हता तर शुद्ध सत्याग्रह होता. " ही कित्येकांच्या मनची भाषा दिळ- काना मनाने ऐकू येत नसेल असे नाही. कित्येकांच्या चेहऱ्यावरहि ती थोडीशी उमटलेली त्याना दिसली असेल. आणि उलट तिला काय उत्तर द्यावयाचे तेहि त्यानी मनाने कदाचित दिले असेल. पण ती वेळ असल्या सूक्ष्म विचारानी माना- पमानाचे देणे घेणे फेडण्याची नव्हती. झाल्या गोष्टीत कोणीहि कोणाचा केवळ व्यक्तिशः दुःस्वास केला होता असे नाही. मतभेद होते ते प्रामाणिकपणाचे होते. पण सर्वच पक्ष आता एकप्रकारे वरच्या वायाला लागलेले असल्यामुळे सर्वांच्या मनाची वृत्ति व्यक्तिनिरपेक्ष आणि उच्च भावनाकडे वळली होती. राजकीय मतभेदामुळे प्रथम वाद नंतर औदासिन्य शेवटी विद्वेष अशा परंपरेने हळूहळू वैर निर्माण झाले. सुरतेच्या बस्नेड्याला इतर कारणे काय बाट- ली ती झालेली असोत पण प्रामाणिक राजकीय मतातील तीव्र मतभेद हे प्रमुख कारण नव्हते असे कोणातच म्हणता यावयाचे नाही. कारण या वखेड्यात स्नेही- स्नेहीं किंबहुना भाऊ भाऊ अशी मंडळी वाटली गेलेली पुष्कळाना माहीत आहेत. सुरतेचा बखेड़ा ही काय एका अर्ध्या तासाची गोष्ट होती. पण त्या पूर्वी व त्यानंतर काही वर्षेपर्यंत जो बाद माजला होता तो खऱ्या तात्त्विक मतभेदा- शिवाय कसा चालू शकता ? हा वाद काही सभा जिंकून पंडितगिरीची पदवी अथवा अजिंक्यपत्र मिळविण्याकरिता नव्हता किंवा सार्वजनिक नाटकातले ते एखादे सोंग नव्हते. ज्या वादाने डोकी फुटली रक्त सांडली घरे उजाड झाली कुटुंबे उध्वस्त झाली मित्रांचे शत्रु झाले त्या वादाच्या मुळाशी राजकीय तत्त्वांचे सिद्धांत बरेचसे होते ही गोष्ट राजशास्त्राची चिकित्सा करणाऱ्याला नाकबूल करता यावयाची नाही. या परिणामाविषयी जितके दुःख वाटते तितकेच कारणाविषयी कौतुक वाटते. अशा रीतीने मतभेद हा तत्वाचा असल्याने त्या तत्वालाच निराळी