पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ लखनौची राष्ट्रीय सभा ६३ काढण्याची शिकस्त करीत होते. सर्कशीत एखादवेळी एकटा मनुष्य मोटार थांब- विण्याचा प्रयोग करून दाखवितो मग येथे जमलेल्या शेकडो लोकाना तो प्रयोग करणे फारच सोपे होते. इतक्यात एका कल्पक मनुष्याने कोणाला न कळता चाकू घेऊन मोटारच्या फुगीर वराच्या धावा कापल्या. तेव्हा मोटार थबकून खालीच बसली. ती पुढे चालणे अशक्य झाले. तेव्हा या इष्ट आपत्तीला सर्वानाच वश व्हावे लागले. रबरी धावा कापणाऱ्या गुन्हेगाराला शिक्षा न होता उलट त्याचा जयजयकार करण्यात आला. नंतर एक मोठी गाडी पुढे आणून तिचे घोडे सोड ण्यात आले. आणि टिळकानी तीत बसवून त्यांची मिरवणूक स्वस्थपणे काढण्यात आली. स्टेशनवरून चारबाग अमिनाबाद वगैरे भागातून ही मिरवणूक चालली. वाटेत पानसुपाऱ्या होतच होत्या. निम्या वाटेत पं. मदन मोहन मालवीय हे टिळकाना सामोरे आले. आणि उभयपक्षी सत्कारसमारंभ होऊन पंडित मदन- मोहन मालवीय याना गाडीत घेऊन मिरवणूक बाजारातून छेदीलाल यांच्या धर्म- शाळेकडे पोचली. या गोष्टीला सुमारे १॥ -२ वाजले. धर्मशाळेच्या गच्चीवर उभे राहून टिळकानी नमस्कारपूर्वक लोकांचे आभार मानले व 'तुम्हा भाग्यवान लोकांच्या या शहरी होमरूलचा झेंडा उद्या राष्ट्रीय सभेपुढे फडकणार' अशा अर्थाचे थोडक्यात उत्साही भाषण करून प्रचंड जनसमुदायाला रजा दिली. धर्मशाळेतील व्यवस्था व्यवस्थापकानी आपल्याकडून फार चांगली केली होती. परंतु थंडीचे दिवस पाहुण्यांची गर्दी जागेचा संकोच यामुळे पुष्कळशा सोई ज्याला त्याला आपल्या आपण करून घ्याव्या लागल्या. टिळकांच्या दिमतीला दिलेली जागा त्यातल्या त्यात चांगली पण तीहि लहानच. दर्शनास येणाऱ्या लोकांची अखंड रीघ यामुळे इतक्या परिश्रमानंतर बाजूला जाऊन निवांतपणे असे पडण्याची टिळकाना सोय नव्हती. थंडीचे दिवस. सर्वाना पाणी ऊन मिळ- ण्याची अडचण. स्वयंपाक वगैरेला सुमारे ३ वाजल्यानंतर सुरवात झाली. आणि संध्याकाळपर्यंत कोणीकडून तरी स्नान उरकून मिळतील ते चार दोस घास घेऊन बिछान्याकरिता जागा आखून सामान व्यवस्थित लावून देता देता पुरेवाट झाली. आदले दिवशी भोगलेल्या चैनीचा वचपा या एका दिवसातील हालानी निघाला ! पण दुसऱ्या दिवसापासून घडी सरासरी बसली. लखनौ येथील राष्ट्रीय सभेचा मंडप प्रशस्त असून उत्तम रीतीने शृंगार- लेला होता. पण त्या सर्व शृंगारात खरी शोभा म्हटली म्हणजे स्वराज्याची मागणी निरनिराळ्या शब्दानी व्यक्त करणाऱ्या रंगीत कागदाच्या अक्षराच्या पाट्या चहूकडे झळकत होत्या ही होय. जिकडे तिकडे 'संतिः कार्यसाधिका' आणि 'स्वराज्याची तहान सुराज्याने भागणे शक्य नाही' ही वाक्ये काँग्रेसच्या मंडपात व बाहेर चोहोकडे झळकत होती. एकी ही खरोखर नको कोणाला ? जे नेमस्त लोक कॉंग्रेस घटनेचे दार काही एका हट्टाने रुंद उघडण्याचे नाकारीत होते त्यानाहि बाहेर राहिलेले लोक लखनौ येथे आत आलेले पाहून आनंद झाला नसेल असे मानणे ही सैतानी