पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ लो. टिळकांचे चरित्र भाग २ मुसलमान लोक हजर होते. प्लॅटफार्मवर बैठकी पसरून दिल्या होत्या. फळफळावळ दूध चहा सर्वच तयारी होती. पण सत्काराकरिता जमलेल्या लोकातून वाट काढून पाहुण्याना फराळाकरिता मांडलेल्या टेबलापर्यंत जाऊन तेथे खाऊन पिऊन परत गाडीत येऊन बसण्याचीच मोठी मुष्कील झाली. अशा रीतीने दिवसभर खाण्या- पिण्याची व्यवस्था चांगली झाल्याने कोणालाहि आपल्या बरोबरचा डबा सोड- ण्याची पाळी आली नाही. उलट सरकाराच्या पदार्थांचा योग्य परामर्ष घेण्याची पंचाइत पडली. भोपाळनंतर वाटेत भिलसा चिन्ना ललितपूर झांशी ऐठ ओराय या स्टेशना- वर पानसुपाऱ्या झाल्या. दिवस थंडीचे असताहि बहुधा प्रत्येक स्टेशनवर लोकांची गर्दी होऊन राहिलेली होती. आणि अनोळखी लोकहि टिळकांचा डबा हुडकून काढून त्याना खाली उतरून पानसुपारी घेण्याला आग्रह करीत. कारण असा सत्कार करण्याला ओळख लागत नाही. आणि ओळखीचा मनुष्य असला तरच त्याच्याकरिता उतरण्याची तसदी घ्यावयाची असा टिळकांचाहि स्वभाव नव्हता. एखाद्या स्टेशनवर गाडी थोडा वेळ थांबली किंवा लोकाना टिळकांचा डबा नेमका सापडला नाही किंवा इतर डब्यातील लोकातच टिळक बसले आहेत अशी समजूत होऊन सत्काराचा भर भलत्याच डव्यावर पडला व गाडी सुटल्या- मुळे लोकाची तारांबळ झाली तरच टिळक या दगदगीतून सुटत नाहीतर टिळ- काना उठून अंगात ओव्हर कोट डोक्याला टोपी घालून खाली उतरावेच लागे. आणि सत्कार व आभारप्रदर्शन हे दोन्ही समारंभ चार दोन मिनिटात उरकावे लागत. अपरात्री दोन ते चारच्या दरम्यान फारशी मोठी स्टेशने आली नाहीत. एखाद्या लहान ठिकाणी गाडी उभी राहिली तर लोक नुसते नमस्कार करून व मागे पुढे स्वपा घालून टिळकांचा सत्कार करण्याची आपली हौस भागवून घेत. तारिख २४ चा दिवस अशा थाटामाटाच्या प्रवासात गेल्यावर ता. २५ रोजी सकाळी गाडी कानपूर येथे पोचली. तिची ठरलेली वेळ ७-७॥ वाजता होती. तथापि तिला अडीच तीन तास उशीर झाला. कानपुरास ही वेळ सोईंची असल्यामुळे सत्कार समारंभ व्यवस्थित झाला. स्पेशल ट्रेनने लखनौ स्टेशन ११ ॥ वाजता गांटले. गाडी पोचताच लोकांची उताविळी गोंगाट जयशब्द यांची गर्दी कशी झाली असेल याची कल्पना सहज करिता येईल. गाडीला अडीच तीन तास उशीर झाल्यामुळे बरेच लोक निराश होऊन परत गेले होते. बाहेर आगा- शीत पोलिस व स्वयंसेवक यानी मिरवणुकीची व्यवस्था केली होती. सर्वजण मो- टारीत असल्यावर लोकानी पाहिले की टिळक आता चटदिशी निघून जातील. मिरवणुकीला अवसर सापडणार नाही. म्हणून त्यातल्या त्यात जे अधिक आग्रही व हौशी होते त्यानी मोटारीला गराडा घातला व मोटार हलूं देत नाही असे सांगितले. व्यवस्थापक व पोलिस हे मोटारीच्या ड्रायव्हरला गाडी चालू करा असे औरओर- डून सांगत होते. आणि तेहि बिचारे आपल्याकडून होईल तितक्या जोराने गाडी