पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स लो० टिळकांचे चरित्र उत्तरार्ध खंड ३ भाग १ ( सन १९१४ ते १९१५ ) (१) मंडालेहून सुटका न १९९४ च्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात टिळकांची सुटका होऊन ते • पुण्यास परत आले. त्यांना सोडण्याची व्यवस्था सरकाराने इतक्या गुप्तपणाने केली होती की तिचा सुगावा आधी कोणासहि लागला नाही आणि लागला असता . तरी त्या बातमीवर फारसा कोणी विश्वास ठेवला नसता. कारण त्यां पूर्वी सहा वर्षात टिळक सुटणार अशाविषयी निरनिराळ्या वेळी बातम्या उठल्या होत्या. • त्या सगळ्या खोट्या ठरल्या होत्या. आणि बातम्या जितक्या मुद्देसूद उठत तितका • त्यांचा खोटेपणा लोकांच्या मनाला अधिक पटे. यातील पुष्कळशा बातम्या मुळात अनुमानिक असत. राजकीय परिस्थितीत कोठे काही फेरफार झाला म्हणजे त्याव- रून लोक आपल्या ठिकाणी अनुमाने करीत आणि मुळात मनचे एक बोलला दुसऱ्याने त्यात भर टाकली तिसऱ्याने ती भर वाढविली असे होता होता त्या खोट्या बातमीची बावडी बने. पण शेवटी ती वाल्यावर उडून जाई. यामुळे बातम्या सांगणाराचा पराभव होऊन लोक कोणतीहि बातमी ऐकली तरी ती खोटीच असणार असे मानण्याला मनाने तयार झाले होते. १९११ साली जॉर्ज बादशहा गादीवर बसले त्यावेळी या बातम्याना फार जोर आला होता. कारण • हिंदुस्थानातील लोकाना खुष करण्यासारखी एक मोठी गोष्ट म्हटली म्हणजे टिळ- कांची सुटका असे सहजच वाटे. नवा राजा गादीवर बसण्याचे वेळी कैद्याना बंध- मुक्त करण्याचा प्रकार सर्व देशात सनातन आहे. आणि सामान्य बंदीजनापेक्षा राजकीय कैद्याना मुक्त होण्याचा हक्क अशा प्रसंगी अधिक असतो. राज्यारोहण हा राजकीय स्वरूपाचा प्रसंग असल्यामुळे राजकीय दृष्ट्या लोकाना आनंद देणारे काही कृत्य नव्या राजाने करावे ही अपेक्षा स्वाभाविक असते. पण या प्रसंगी ही केवळ लोकांचीच अपेक्षा होती असे नाही तर टिळकांची मुक्तता यावेळी करावी की नाही असा प्रश्न सरकार दरबारी प्रत्यक्ष उपस्थित झाला होता हे काही खोटे नाही. पण लॉर्ड सिडेनहॅम हे यावेळी मुंबईचे गव्हर्नर असल्यामुळे त्यानी या सूच- नेला जोराचा विरोध केला. आणि आपल्या म्हणण्याला जोर यावा याकरिता त्यानी इलाख्यातील काही संस्थानिक व काही राजकीय पुढारी यांचे प्रतिकूल अभिप्राय मिळवून ते वरिष्ठ सरकाराकडे पाठविले होते असे म्हणतात. नक्की