पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ लखनौची राष्ट्रीय सभा ६१ सत्काराची तयारी करून ठेवलेली होती. त्याचा परिणाम एक मात्र असा झाला की आगगाडीतील मंडळींना रात्री स्वस्थपणे झोप मिळावी तो मिळाली नाही. बहुवा प्रत्येक स्टेशनवर गाडी पोचताच तेथे जमलेला मोठा समाज जयजयकार करून गाडीतून टिळकप्रभृति मंडळीना खाली उतरून घेऊन त्याना पानसुपारी देई. पण गाडीतल्या मंडळीची तक्रार कोण ऐकणार ? कारण स्टेशनवर जमलेल्या लोकांचीहि तशीच झोपमोड झाली होती. गांवोगावच्या लोकानी त्या दिवशी रात्र अशी मानलीच नाही. वाटेत मनमाड भुसावळ अशा सांध्याच्या जागी या स्पेशल गाडीतून जाणारे त्या त्या भागातील होमरूलर येऊन मिळाले. कल्याणास बापुसाहेब फडके चाळीसगावास नामदार उपासनी व काझीसाहेब भुसावळेस गोगटे वकील इत्यादिकानी टिळकांचा सत्कार केला. भुसावळ स्टेशनवर होमरूल लीगचे निशाण आगगाडीवर चढविण्यात आले. हरदा येथे दोन प्रहरी साडेबारा वाजता गाडी पोचण्याची असल्यामुळे पाहुणे मंडळीना भोजन घालण्याची योजना स्थानिक पुढाऱ्यानी केली. गाडीतून उतरून जेवण करून फिरून आगगाडीत चण्याइतकाच वेळ अधिकाऱ्यानी वेळापत्रकात ठेवला होता. तथापि जेवणाच्या गर्दीत पानसुपारी व व्याख्याने यांच्या गर्दीची भर पडली होती. यामुळे हा ठरा- विक दीड तासाचा वेळ पुरला नाही. स्वयंसेवक लोक पंक्ती वाढून हातात वाढणी घेऊन सज्ज राहिले होते. पाहुण्यानीहि जसे ज्याला बनेल त्या प्रमाणाने कोणी थंड पाण्याने कोणी ऊन पाण्याने आंघोळ करून जेवण उरकून घेतले. पण अशा ह्या तातडीच्या भोजनप्रसंगीहि हौशी लोकानी श्लोक किंवा पदे म्हणण्यास कमी केले नाही. भोजनोत्तर पानसुपारी होण्याच्या ठिकाणी गांवचे लोक आधीच सभा भरवून बसले होते. त्या ठिकाणी मंडळी जाताच टिळकादि पाहुण्यांच्या सत्काराची व आभार- प्रदर्शनाची भाषणे थोडथोडी सूत्ररूपाने होऊन सर्व मंडळी धावत परत येऊन आगगाडीत आपल्या जागी बसली. वेळापत्रकातील वेळ चुकण्याला म्हणजे लांब- ण्याला येथून थोडा प्रारंभ झाला. आधी साडेदहा वाजता खांडव्यास न्याहारी झाली होती. आणि त्यानंतर १२ वाजता हे चमचमीत जेवण मिळाले. अशा रीतीने प्रवासात होणारी उपासमार लोकांची यावेळी भरून निघाली. डॉ. सालपे- कर यानी जिलबी तोंडली भात बगैरे पक्कान्नेहि केली होती. आणि मंडळीला संकोच काय तो आगगाडीच्या टाइमटेबलामुळे होईल तितकाच होता. पाहु- ण्यांचे आवाहन व विसर्जन मंगल वाद्यांत होऊन सुमारे २॥ वाजता गाडी पुढे निवाली. दोन प्रहरी चार वाजता हुदांगाबादचे गावी लोकानी मसाल्याच्या केशरी दुधाचे इंडे तयार ठेवले होते. त्यांचाहि समाचार घेण्यात आला. भोपा- ळला गाडी रात्री साडेआठ वाजता पोचली. वास्तविक भोपाळ हे मुसलमानी व मागासलेल्या संस्थानी राज्यातील एक. तेथे सरकारी कटाक्ष विशेष. हिंदु पुढाऱ्या- बद्दल आदर नाही. अशी स्थिति असताहि तेथे गावच्या लोकानी जो सत्कार समारंभ केला तो त्या मानाने फारच अपूर्व वाटला. स्टेशनवर सुमारे ५००.