पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६० लो० टिळकांचे चरित्र भाग २ बेळगावच्या परिषदेनंतर आपला पक्ष राष्ट्रीय समेत ६-७ वर्षानी प्रथमच जाणार म्हणून टिळकानो आपल्या पक्षाचे जितके अधिक लोक सभेला जातोल तितके नेण्याचा कसून प्रयत्न केला. यामुळे एकंदर महाराष्ट्रांतून या सभेला सुमारे चार पाचशे प्रतिनिधि गेले. याच वेळी स्पेशल आगगाड्या काढून राष्ट्रीय सभेला जाण्याची कल्पना निघालो. ती सिद्ध करण्याचे पुष्कळसे श्रेय मुंबईतील डॉ. साठे प्रभृतीना दिले पाहिजे. लोक आपल्या परीने जाणारच पण संघटनात्मक प्रयत्न न केला तर ते ठराविक एक दोन दिवशी आगगाडीत गर्दी करून फक्त आपली गैरसोय करणार. म्हणून अलिकडे पलिकडे एखादा दिवस वर्ज्य करून एकाच दिवशी पुष्कळानी निवावयाचे असे ठरविल्यास एका स्पेशल आगगाडीच्या ट्रेनची भरती होते ही गोष्ट लक्षात आणून डॉ. साठे यानो रेल्वे अधिकाऱ्याकडे खटपट करून स्पेशल ट्रेन काढण्याचे ठरविले. केवळ होमरूलर व टिळकांचे अनु- यायी असे २००-३०० लोक सहज जावयास निघतील अशा समजूतीने ही स्पेशल ट्रेन काढण्यात आली, म्हणून हिला होमरूल स्पेशल हे नाव यथार्थपणे देता आले. लखनौला जाण्याकरिता स्पेशल ट्रेन निघणार असे प्रसिद्ध होतांच पुणे . मुंबई वन्हाड नागपूर व महाराष्ट्रातील इतर शहरे येथून भडाभड तारा व पत्रे पाठवून लोकानी आपली जागा राखून ठेवण्याविषयी मुंबई नॅशनल यूनीअनकडे कळविले. आणि गर्दी इतकी झाली की ट्रेन निघण्याच्या आधी दोन दिवस बहुतेक सगळ्या जागा भरून गेल्या ! टिळक व इतर काही मंडळी मुंबईस आधी एकदोन दिवस गेली होती. तारिख २३ डिसेंबर रोजी व्यवस्थापकानी कोणी कोठे बसावयाचे यासंबंधाने ठरवून प्रत्येक डब्यावर लोकांच्या नावच्या चिठ्या लावून टाकल्या होत्या. रात्री ८ ॥ च्या सुमाराला ही गाडी मुद्दाम वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आणून ठेवण्यात आली. आणि टिळकप्रभृति मंडळी गाडीत जाऊन बसण्याच्या वेळी स्टेशनवर इतकी गर्दी लोटली की ती हटवून गाडीत जाऊन बसणाऱ्या लोकाना वाट मिळण्याला मुंबईच्या स्वयंसेवक मंडळीला फारच श्रम घ्यावे लागले. स्पेशल ट्रेन निघण्याची कल्पना नवीन असल्यामुळे कोणत्याहि अशा नवीन कल्पनेप्रमाणे सर्व लोकात तिने मोठे कौतुक उत्पन्न केले. आणि होमरूलर मंडळीचा भरणा पुष्कळ होतो इतकेच नव्हे तर तिच्यात संघटनाहि विशेष होऊ शकते याचेच हे लक्षण असे लोक म्हणू लागले. टिळकांच्या डब्यात फुलांच्या हारांचे भारे येऊन पडलेच होते. पण त्यांच्या डब्याला ते बाहेरूनहि लटकविण्यात आल्यामुळे या स्पेशल ट्रेनला एक प्रकारे विजयोत्सवाचे स्वरूप आले होते. स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक आधीच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्यामुळे मुंबईपासून लखनौ पर्यंतच्या लोकाना आगाऊ सूचना सहजच मिळाली. आणि टिळक सात वर्षानी विशेषतः सहा वर्षांच्या तुरुंग- वासातून जगून वाचून येऊन राष्ट्रीय सभेला निघाले म्हणून त्याना भेटण्याकरिता व त्यांच दर्शन घेण्याकरिता वांटतील मोठमोठ्या बहुतेक स्टेशनवर लोकानी