पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ लो० टिळकांचे चरित्र भाग २ कानी चिथावणीचे कोणतेहि भाषण करू नये." टिळकानी नोटीस पाहून ती खिशात घातली व त्यानी ओगॉरमन याना सांगितले की "नोटिशीत माझ्या स्वतःवर काय बंधन घातले आहे ते मी जाणतो. पण तुम्ही लोकाना जबरीने बाहेर घालविले आणि आत येऊ देत नाही याचे कारण काय ? " तेव्हा अधिकारी म्हणाले की "आम्हाला तोंडी हुकूम आहे.” टिळक म्हणाले " नुसती पानसुपारी देणे घेणे व आभार मानणे याना ही नोटीस लागू नाही. तरी तशी नवी नोटीस तुझाला द्याव- याची असली तर द्या.” तेव्हा डेप्युटी कलेक्टर हे काय करू म्हणून विचारण्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे जाऊन परत आले व म्हणू लागले की "तुमच्या भाषणात आभारप्रदर्शनापलीकडे काही येता कामा नये आणि सर्व समारंभ पाच मिनिटात उरकला पाहिजे.” त्यावर टिळक म्हणाले "दूर उभे असलेले लोक परत येऊन बस- ण्यासच पाच मिनिटे लागतील. तेव्हा अधिकारी म्हणाले " लोक येऊन बसल्या- पासून पाच मिनिटे मोजू, " मग धारवाडचे वकील अलूर यानी टिळकाना हाय- कोर्टाने सोडले या गोष्टीचा उल्लेख करून टिळकांचे अभिनंदन करून पानसुपारी दिली आणि टिळकानीहि दोनतीन मिनिटे भाषण करून आभार मानले आणि स्वराज्याची मागणी ही कायदेशीर ठरली आहे तरी ते लोकानी मागावे असे सांगून भाषण आटपले. ' श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ' या वाक्याची आठवण टिळकाना व लोकाना या वेळी झाली असल्यास नवल नाही. अवघ्या पाच मिनिटात सगळे " नवल वर्तले, " गदग येथील दोन देवळात त्या दिवशी लोकानी शिखरे पाजळली. त्याला अर्थातच सरकारची मनाई नव्हती ! त्याना स्टेशनावर परत पोचविण्याच्या वेळीहि हजारो लोकांची गर्दी झाली होती. गदहून टिळक हुबळीला आले. त्याच्या आधीच गदग येथील हुकूम हुबळीस आला होता. पण येथे कदाचित पाच मिनिटांची मुदत हुकमाबरोबर आली नव्हती त्यामुळे हुबळीकरानी योजिलेले पानसुपारीचे कार्य निर्विघ्नपणे पार पडले. हुबळीचे सत्पु- रुप श्रीसिद्धारूढ सभेस हजर होते. तबीब वकील यानी हुबळीकरातर्फे मानपत्र वाचून दाखविले. उत्तर देताना टिळकानी सांगितले की आता मनु पालटत चालला आहे तरी सगळे स्वराज्यवादी बना. लगेच तेथल्या तेथे होमरूल लीगची शाखा स्थापन करण्यात आली व पानसुपारी फोटो वगैरे सर्व कामे तडीस गेली. हुबळीहून टिळक धारवाड येथे आले, गदग येथील वार्ता येथे पूर्वीच आली असल्याकारणाने तेथील पानसुपारीचा समारंभ लोकानी खासगी आवारात केला होता. पण यानंतर टिळ- कांची मिरवणूक लोकानी काढली आणि अशा रीतीने धारवाड जिल्ह्यातील हा छोटा दौरा थोडक्यात उरकण्यात आला. धारवाडहून येताना वाटेत बेळगावकरानी मध्येच टिळकाना उतरवून घेतले. ता. २२ नोव्हेंबर रोजी एका खासगी जागेत पानसुपारीची व्यवस्था केली होती. तेथेहि टिळकांचे थोडे भाषण झाले. दुसरे दिवशी टिळक पुण्यास परत आले.