पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ खटल्या नंतरची चळवळ ५७ मागावा येथपर्यंत मजल येऊन ठेपली. तथापि ध्येय एकच ठरले तरी ते मिळ- विण्याचे मार्गात फरक राहणारच व तो थोडा राहिलाहि. आणि अजूनहि तो बाद मिटला होता असे म्हणता येत नाही. तथापि काँग्रेसच्या इतिहासात हा एक नवा टप्पा आला. आणि काँग्रेसची सायकल जरी जड बुडाची असली तरी तिच्याबरोबर पण अधिक जलदीने चालणाऱ्या स्वराज्यसंघानी काँग्रेसला येथपर्यंत ओढून आणले. निष्ठांच्या शब्दानी बोलावयाचे तर काँग्रेस ही स्थितिनिष्ठ होती व स्वराज्यसंघ हे प्रगतिनिष्ठ होते. एका चिकित्सक बुद्धीच्या बालशिक्षणपंडिताने असे लिहिलेले आहे की "जे तान्हे मल भल्या मोठ्या पर्वतासमोर उभे केले असता भीत नाही ते एखादी मुंगी देखील चालत जवळ आली तर भिते. " त्याप्रमाणे सरकारकडून सुधारणा मिळवावयाच्या तर स्थितिनिष्ठेपेक्षा गतिनिष्ठा होच अधिक फलप्रद असे म्हणता येते आणि काँग्रेसवाल्यानाहि हे तत्व हळुहळू पटत चालले होते. पण या वेळेस ब्राहाणेतर संघाने स्थितिनिष्ठांची बाजू राखली म्हणावयाची. कारण हिंदु- स्थानातील जातिभेद मोडेपर्यंत तो स्वराज्याला पात्र असे मानता येणार नाही म्हणून आह्माला स्वराज्य नको असे ब्रीदवाक्य लिहून त्याने आपले निशाण उभे केले ! सरकारचीहि बुद्धि पालटली नव्हती हे टिळकांवर झालेल्या खटल्यावरून आणि प्रेस अॅक्टाच्या जुलुमावरून उघड दिसून येत होते. पण याशिवाय जिल्हा - निहाय अधिकाऱ्यानी जे बर्तन ठेवले होते त्यावरून ते अधिकच ढळढळीतपणे नज- रेला येत होते. याचे एक उदाहरण नोव्हेंबरमध्ये या साली टिळक हुबळी गदग इकडे गेले तेव्हा घडून आले. पुणे येथील डेक्कन बँकेचे लिक्विडेटर यांच्या विनंतीवरून गदग येथील गिरणीच्या बाबतीत शेठ मनमोहनदास याना घेऊन टिळक गदग येथे गेले. टिळकांचा सत्कार करावा असे गदग येथील नागरिकांना वाटून 'त्यानी एका मोठ्या खुल्या जागेत टिळकाना पानसुपारी करण्याचे योजिले. याच सुमारास धारवाड जिल्ह्याचे अ. पोलिस सुपरिंटेंडेंट ओगॉरमन हे कलेक्टर मि. टर्नर यासह गदगेस गेले होते. त्याना या पानसुपारीची बातमी लागली व तिला प्रतिबंध कर- ण्याचे त्यानी योजिले, सभा बंद करणार अशी वदंता दोनप्रहपासून असल्यामुळे समेत्रे चालक निमंत्रण द्यायला गेले तेव्हा टिळकानी त्याना सांगितले की वदंता अशी अशी आहे. पण मी तयार आहे. तरी तुमचे तुम्ही पाहा. अखेर सभा तर ठरलीच. पण टिळक व मनमोहनदास कॉटनमार्केटची पानसुपारी घेऊन सभेच्या जागी जाऊन पोचले तो असे दिसून आले की अधिकारी पोलिसपार्टी घेऊन सभेच्या जागी आले होते व त्यानी हजारो माणसे बाहेर हाकून लाविली असून प्लॅटफॉर्महि विस्कळित झाला होता. याचे मर्म टिळकानी ओळखले. पण लोकाना सांगितले की मंडळीना बोलवा व प्लॅटफॉर्म जुळवून मांडा. इतक्यात ओगॉरमन हे पुढे होऊन त्यानी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्या सहीची पोलिस अॅक्टाच्या ४२ व्या कलमाखाली काढलेली नोटीस टिळकांच्या हातात दिली. त्यात लिहिले होते की “म्युनिसिपल हद्दीत रस्त्यात अगर लोकास दिसतील अशा ठिकाणी टिळ-